ETV Bharat / bharat

प्रॉमिस डेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराला द्या 'ही' खात्री; तुमचे नाते होईल घट्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 12:12 PM IST

Promise Day 2024 : व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे ही काही वचने आहेत जी तुम्ही तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. जर या गोष्टी पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुमचे नाते आणखी यशस्वी होईल.

Promise Day 2024
प्रॉमिस डे 2024

Promise Day 2024 : प्रेमाचा आठवडा रोज डेनं सुरू झाला. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रत्येक दिवस खास असतो आणि जोडप्यांना त्यांच्या स्वत:च्या शैलीत तो संस्मरणीय बनवायचा असतो. 'प्रॉमिस डे' या आठवड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला आहे. या दिवशी, प्रेमी एकमेकांसाठी त्यांच्या प्रेमाची शपथ घेतात, म्हणजेच ते वचन देतात. वचने तुमचे नाते मजबूत करतात आणि तुम्हाला भविष्यात एकत्र राहण्याची भावना देतात. आम्ही तुम्हाला अशा प्रॉमिस डेबद्दल सांगतो ज्याद्वारे तुम्ही काही खास वचने देऊन तुमचे नाते अधिक खास बनवू शकता.

  • एकमेकांचा आदर करण्याचं वचन : आदर हा कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया असतो. जेव्हा तुम्ही भांडण किंवा वाद घालत असता तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की, काहीही झालं तरी तुम्ही तुमची प्रतिष्ठा राखली पाहिजे. या प्रॉमिस डेला तुमच्या जोडीदाराला वचन द्या की, काहीही झाले तरी तुम्ही त्यांच्यासाठी कधीही चुकीचा शब्द वापरणार नाही आणि त्यांचा नेहमी आदर कराल.
  • मोकळेपणानं बोलण्याचं वचन : अनेक वेळा असं होतं की, तुम्ही एकमेकांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवता किंवा अर्ध्याच गोष्टी तुमच्या पार्टनरला सांगतात, अशा परिस्थितीत तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, या प्रॉमिस डेला तुमच्या जोडीदाराला वचन द्या की, तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर नेहमी उघडपणे व्यक्त कराल.
  • एकत्र वेळ घालवण्याचे वचन : असं म्हणतात की, वेळेपेक्षा मौल्यवान कोणतीही भेट नाही. तुमच्या व्यस्त जीवनात तुम्हाला एखाद्यासाठी वेळ मिळत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप खास आहे. या प्रॉमिस डेला, तुमच्या जोडीदाराला वचन द्या की, काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा पूर्ण प्रयत्न कराल.
  • तुमच्या जोडीदाराचं ऐकण्याचं वचन : संवादामुळं कोणतेही नाते अधिक घट्ट होते. पण जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये फक्त तुमचं मत व्यक्त करत असाल आणि तुमच्या पार्टनरचं ऐकत नसाल तर ते चुकीचं आहे. म्हणूनच, या प्रॉमिस डेला तुमच्या जोडीदाराला वचन द्या की, तुम्ही दोघेही नेहमी एकमेकांचे ऐकाल आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल.
  • जोडीदाराच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याचं वचन : तुमच्या जोडीदाराला गायक, नृत्यांगना किंवा कलाकार व्हायचं असेल, तर तुम्ही त्यांच्या स्वप्नांचा आदर कराल आणि पूर्ण करण्यासाठी त्यांना साथ द्याल. जरी संपूर्ण जग त्यांच्या विरोधात गेले तरी तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहाल.
  • एकत्र वृद्ध होण्याचं वचन : आजकालचा काळ असा आहे की, लोकांची नाती फार काळ टिकत नाहीत. लोकं नाती अगदी अनौपचारिक पध्दतीने घेऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला वचन द्या की, तुम्ही एकमेकांना कधीही सोडणार नाही आणि वृद्धापकाळापर्यंत एकमेकांचा आधार राहाल.
  • जुन्या गोष्टी विसरण्याचं वचन द्या : बरेचदा भूतकाळात केलेल्या चुकांच्या आधारे आपल्या जोडीदाराशी भांडण होते. या चुका अशा आहेत की आपण बदलू शकत नाही. म्हणून त्यांच्याशी भांडणे व्यर्थ आहे. अशा परिस्थितीत या प्रॉमिस डेला तुमच्या जोडीदाराला वचन द्या की, जुन्या गोष्टींमुळं तुम्ही तुमचा वर्तमान कधीही खराब करणार नाही.
  • कायमच एकत्र राहण्याचं वचन : आयुष्यात काय होईल हे कोणालाच माहीत नाही. होय, पण हे नक्कीच माहित आहे की, जर तुम्ही एखाद्यावर खऱ्या मनाने प्रेम करत असाल आणि त्याच्याशी नाते टिकवायचे असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. त्यामुळं या प्रॉमिस डेला तुमच्या जोडीदाराला वचन द्या की, काहीही झालं तरी तुम्ही दोघेही मरेपर्यंत एकमेकांना साथ द्याल.

हेही वाचा -

  1. आला प्रेमाचा आठवडा; Rose Day पासून सुरू होतो व्हॅलेंटाईन सप्ताह; जाणून घ्या लिस्ट
  2. 'टेडी डे'ला आपल्या प्रियजनांना द्या 'या' रंगाचा टेडी; तुमचं प्रेम आणखीनच फुलेल
  3. फेब्रुवारीतच 'व्हॅलेंटाईन्स डे' का साजरा केला जातो? 'हा' आहे त्यामागं दडलेला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.