ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'साताऱ्याची निवडणूक...' - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 8:50 PM IST

Updated : May 5, 2024, 10:57 PM IST

Lok Sabha Election 2024 : साताऱ्याची निवडणूक आम्ही प्रचंड बहुमतांनी जिंकणार असल्याचा दावा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलाय. तसेच अंतिम निकालानंतर सहा पैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकितही त्यांनी वर्तवलंय.

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण (Maharashtra Desk)

प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण (Reporter Sudhir Patil)

सातारा Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातील निवडणूक आम्ही प्रचंड बहुमतांनी जिंकणार असून अंतिम निकालानंतर सहा पैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी वर्तवलं आहे. राज्यात २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार बनलं. ते सत्तेवर राहिले असते तर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची एकही जागा निवडून आली नसती, असा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय.



फूट पाडून गेलेल्या गद्दारांना मतदार पाडणार : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्याआधी दुपारी पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडून जे आमदार गेले. त्यांना मतदार आपल्या बरोबर आहेत, असे वाटत असेल तर त्यांचा तो भ्रम या निवडणुकीत दूर होईल. मतदार सर्व गद्दार आमदार, खासदारांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत.



मोदींनी प्रचाराची पातळी खाली नेली : प्रचाराची पातळी फारच खाली गेली. उमेदवार आणि प्रचारकांच्या पातळीवर ते समजून घेता आलं असतं. परंतु, पंतप्रधानांनी प्रचाराची पातळी खाली नेली, हे आश्चर्यकारक असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. लोकांच्या मुद्यावर चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक टीकाच जास्त झाली. शरद पवारांबद्दल पंतप्रधान भटकती आत्मा म्हटल्यानंतर भाजपाला मोदींचे फोटो असलेले पोस्टर्स काढावे लागले. इतका लोकांच्यात राग असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय.



उदयनराजेंना निवडून यायची खात्री नाही : सातारा लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी बऱ्याच सभा झाल्या. राज्यसभा देतो, मंत्रिपद देतो, कारखान्याला कर्ज देतो, अशी बरीच आश्वासन दिली गेली. पण, त्याचा काही उपयोग होणार नाही. २०१९ मध्ये उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देवून पोटनिवडणूक लढवली होती. पण, आता राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. जर निवडून यायची खात्री असती तर राजीनामा देवून निवडणूक लढली असती. तसेच या निवडणुकीचा जो निकाल लागेल तो बराच अनपेक्षित असेल.

निकालानंतर सहापैकी दोन पक्ष संपुष्टात येतील : महाविकास आघाडीच्या बाजूने आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सुप्त लाट असून निवडणुकीचे टप्पे वाढत आहेत, तसतसे ती सुप्त लाट उघड व्हायला लागल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, अशा प्रकारचा निकाल लागेल. शरद पवारांशी झालेल्या चर्चेत अपेक्षित नसणाऱ्या जागा देखील निवडून येतील, अशी माहिती समोर आलीय. अंतिम निकालानंतर सहापैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकितही पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलंय.

हेही वाचा -

  1. वर्षा गायकवाड, अनिल देसाई यांच्यात छुपा समझोता, विकास कामामुळं विजय होणार - राहुल शेवाळे - Anil Desai vs Rahul Shewale
  2. तर 'एमआयएम' पुण्यात 'टिपू सुल्तान'चे स्मारक उभारणार, भाजपा-हिंदुत्ववादी संघटना खडबडून जाग्या - Tipu Sultan Memorial Issue
  3. 'नकली मोदी भक्त' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर संजय राऊतांनी केली टीका - Lok Sabha Election 2024
Last Updated :May 5, 2024, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.