ETV Bharat / state

वर्षा गायकवाड, अनिल देसाई यांच्यात छुपा समझोता, विकास कामामुळं विजय होणार - राहुल शेवाळे - Anil Desai vs Rahul Shewale

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 6:27 PM IST

Updated : May 5, 2024, 7:25 PM IST

Anil Desai vs Rahul Shewale : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार रंगत पहायला मिळणार आहे. या मतदार संघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटानं माजी खासदार अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केलीय.

Anil Desai vs Rahul Shewale
खासदार राहुल शेवाळे (Reporter Etv Bharat Maharashtra)

राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया (Reporter Etv Bharat Maharashtra)

मुंबई Anil Desai vs Rahul Shewale : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटात प्रतिष्ठेची लढाई बघायला भेटणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे गटाचे माजी खासदार, अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

शेवाळे तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत : या मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत होणार असून राहुल शेवाळे हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गट उद्धव ठाकरे यंदा काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे. तर राज ठाकरे हे राहुल शेवाळे यांच्या करता धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबणार आहेत.

प्रश्न - राहुल शेवाळे तुम्ही हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहात. तर, तुमच्या विरोधात तुमचे जुने सहकारी शड्डू ठोकूण उभे आहेत. भावनिक मुद्द्यावर शिवसेनेच्या दोन गटातील ही महत्त्वाची लढाई आहे?

उत्तर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. आम्ही ही निवडणूक नेहमी प्रतिष्ठेची म्हणतो. या मतदारसंघातून शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची संधी मला दोनदा लाभली. वास्तविक ही लढाई भावनिक मुद्द्यावर होण्याचं काही कारण नाही. खरी शिवसेना आमचीच असून बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. माझ्यासमोर कोण उमेदवार आहे, हे महत्त्वाचं नाही. तर मागील दहा वर्षे जी विकास काम मी या मतदारसंघांमध्ये केली, त्या विकास कामांच्या आधारावर या मतदारसंघातून माझा विजय नक्की आहे. या निवडणुकीत भावनिक मुद्दा असला, तरी सुद्धा जनता सर्व जाणते.

प्रश्न - या मतदारसंघांमध्ये वर्षा गायकवाड, अनिल देसाई यांच्यात छुपा समझोता झाला आहे?

उत्तर - या मतदारसंघातून उमेदवारीसाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड या मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक होत्या. परंतु महाविकास आघाडीनं विशेषता उबाठा गटानं त्यांचा पत्ता कट करत या मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. परंतु हा मतदारसंघ कोणाची प्रॉपर्टी नाहीय. या मतदारसंघात आमच्यासमोर कोण उभा आहे, त्यामुळं काही फरक पडणार नाहीय. या मतदारसंघातील माहीम या विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वात विकासाची अनेक कामे झाली आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आता मार्गी लागणार आहे. मागील दहा वर्षात बीडीडी चाळ, धारावी पुनर्वसन, म्हाडाच्या 388 वसाहती, मोडकळीस आलेल्या इमारती, गावठाण भाग, एसआरएचे रखडलेले प्रकल्प असे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात यश आलं आहे. धारावीतील जनता ही विकासाच्या बाजूनं आहे. येथील लोक आता राजकारणाला कंटाळले असून 20 तारखेला धनुष्यबाणा समोरील बटन दाबून ते विकासाच्या बाजूनं असल्याचं सिद्ध करतील, असा आशावादही राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.

प्रश्न - हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या भावनिक मुद्द्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं उत्तर याकडं तुम्ही कसे बघता.

उत्तर - राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी दक्षिण मध्य मुंबई हा शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे. याचं कारण शिवसेनेची स्थापना, शिवसेनेची वाटचाल, त्याची राजकीय कारकीर्द या सर्व घडामोडी याच मतदारसंघातून घडल्या. त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्ववादी विचार पुढं नेण्याचं काम आम्ही करत आहोत. ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्या काँग्रेसच्यासोबतीला उद्धव ठाकरे गेले. ज्या काँग्रेसनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतला, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले. म्हणूनच 20 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जनता सावरकरांचा, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अपमानाचा बदला घेईल, असंही शेवाळे म्हणाले.


प्रश्न - वर्षा गायकवाड ऐवजी अनिल देसाई यांना विजय सोप्पा झाला आहे का?

उत्तर - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून या मतदार संघात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा जोरात होती. परंतु गटा-गटानं हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्यास नकार दिला. अति घाईत या मतदारसंघातून माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली. या कारणास्तव वर्षा गायकवाड यांना नाराज झाली. अखेरकार वर्षा गायकवाड यांची मनधरणी करत त्यांना उत्तरमध्य मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली असून त्यांची नाराजी दूर झाली आहे. परंतु अनिल देसाई हे राहुल शेवाळे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करतील अशी शक्यता दिसत नाही. वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईमध्ये व्यस्त झाल्या असल्याकारणानं या मतदारसंघावरील त्यांची पकड सैल होणार आहे. याचा फायदा राहुल शेवाळे यांना होणार असून राहुल शेवाळे यांच्या मताधिक्यात किती वाढ होते, की अनिल देसाई कुठला चमत्कार घडवतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलंत का :

  1. हेमंत केरकरेंना 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या गोळ्या, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ - Vijay Wadettiwar
  2. "पक्ष चिन्हासारखं आमचं ग्राउंडही चोरीला गेलं, पण जनतेने निवडणूक...", रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  3. ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे 4 डमी उमेदवार, मतदारांना संभ्रमित करण्याचं हे षडयंत्र असल्याचा संजय पाटील यांचा आरोप - North East Mumbai Lok Sabha
Last Updated :May 5, 2024, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.