ETV Bharat / bharat

आज NEET परीक्षा! परीक्षेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी - NEET UG 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 9:00 AM IST

Precautions Under NEET UG
आज NEET परीक्षा! परीक्षेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी (Etv Bharat)

Precautions Under NEET UG : देशभरातून सुमारे 24 लाख विद्यार्थी आज (5 मे) NEET परीक्षा देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, यासंदर्भात आपण जाणून घेऊया.

कोटा Precautions Under NEET UG : देशभरातील तब्बल 544 शहरांमध्ये आज (5 मे) वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही भारताबाहेरील 14 शहरांमध्ये देखील ऑफलाइन पद्धतीनं या परीक्षेचं आयोजन करते. दुपारी 2 ते 5.20 या वेळेत 13 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर अनेक नियम आहे. हे नियम मुलांना पाळावे लागणार आहे. नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईदेखील होई शकते. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कोणती काळजी घ्यावी या बाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे समन्वयक राजस्थान प्रदीप सिंह गौर यांनी सांगितलं की, "परीक्षेचं प्रवेशपत्र 3 पानांचं आहे, यामध्ये पहिलं पान स्वयं-घोषणापत्र आहे. दुसरं पान पोस्टकार्ड आकाराच्या फोटोंसाठी आहे. तसंच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून परीक्षा केंद्रावर न्यावा लागेल. या स्वयंघोषणामध्ये तीन बॉक्स दिलेले आहेत. पहिल्या बॉक्समध्ये अर्ज करताना अपलोड केलेले रंगीत छायाचित्र चिकटवावं लागेल. दुसऱ्या बॉक्समध्ये डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, तर तिसरा बॉक्स विद्यार्थ्याने परीक्षा हॉलमध्येच भरायचाय. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराला स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. परंतु ही स्वाक्षरी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांसमोरच करावी लागेल.

या गोष्टी लक्षात ठेवा:

  • पारदर्शक पाण्याची बॉटल आणि सॅनिटायझर बाळगता येईल.
  • सोबत सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म न्यायला विसरू नका.
  • सोल्ड शूज तसंच जाड कापड असलेले कपडे घातलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
  • प्रवेशपत्रासोबत, विद्यार्थ्यांना सरकारनं जारी केलेले कोणतेही मूळ ओळखपत्रदेखील सोबत ठेवावं लागेल. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, 12 वी बोर्ड ॲडमिट कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, फोटो असलेली आधार एनरोलमेंट स्लिप वैध असेल. ही कागदपत्रे फोटोकॉपीमध्ये किंवा मोबाईल फोनवर दाखवणं वैध ठरणार नाही.
  • परीक्षेची वेळ संपल्यानंतर, जोपर्यंत पर्यवेक्षक सूचना देत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यानं आपली जागा सोडू नये.
  • परीक्षेनंतर, विद्यार्थ्यांनी OMR शीटची मूळ आणि कार्यालयीन प्रत आणि प्रवेशपत्र निरीक्षकांना द्यावे. तसं न केल्यास परीक्षेतून अपात्रतेसह विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

परीक्षाकेंद्रात गोष्टींना असेल बंदी :

  • मजकूर अभ्यासक्रम (मुद्रित किंवा लिखित), कागदाचे तुकडे, पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पिशवी, कॅल्क्युलेटर, पेन, स्केल, लेखन पॅड, पेन ड्राइव्ह, खोडरबर, कॅल्क्युलेटर, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन/स्कॅनर यासारखी कोणतीही वस्तू.
  • मोबाईल फोन, ब्लूटूथ, इअरफोन, मायक्रोफोन, पेजर सारखी संप्रेषण साधनं.
  • हेअर बँड, वॉलेट, चष्मा, हँडबॅग, बेल्ट, हॅट्स, कोणतंही घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ.
  • कोणतेही दागिने/धातूच्या वस्तू.
  • खाद्यपदार्थ

परीक्षेदरम्यान 'या' चुका करू नका:

  • परीक्षेचा पेपर आणि OMR क्रमांक जुळवून बघावा.
  • नाव आणि सर्व माहिती अचूक भरावी.
  • ओएमआर शीटमध्ये ओव्हररायटिंग करू नये.
  • प्रश्नांची उत्तर पूर्णपणे जुळल्यानंतरच वर्तुळ भरा.
  • वर्तुळ भरताना ओव्हरलॅप करू नका. वर्तुळ पूर्णपणे काळे करा. वर्तुळ स्वच्छ आणि कोणतेही डाग नसलेले असावे
  • जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर ते सोडा, तुमचा वेळ वाया घालवू नका.
  • ओएमआर शीटवर विचारलेल्या माहितीशिवाय दुसरं काहीही लिहू नका.
  • ओएमआर शीट फोल्ड करू नका.
  • ओएमआर शीट भरताना घाई करू नका आणि पत्रक दुमडू नका.
  • शेवटच्या क्षणी घाईगडबडीत चुका होण्याची शक्यता असते, त्यामुळं अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगा.

परीक्षेचा नमुना असा असेल :

  • प्रश्नपत्रिकेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांचे 200 प्रश्न असतील. म्हणजे प्रत्येक विषयासाठी 50 गुण.
  • सर्व विषय अ आणि ब या दोन विभागात विभागले जातील.
  • अ विभागात 35 आणि ब विभागात 15 प्रश्न असतील.
  • अ विभागातील सर्व 35 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, तर ब विभागातील 15 पैकी 10 प्रश्न अचूक पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करावा.
  • ही संपूर्ण प्रश्नपत्रिका 720 गुणांची असेल.
  • प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी चार गुण आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण वजा होईल.

हेही वाचा -

  1. कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; शिकवणी वर्गात 500 विद्यार्थी घेत होते NEET, JEE ची शिकवणी - Students Suffer Food Poison
  2. 'नीट' प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोटामध्ये आत्महत्या
  3. Pratibha Vathore : आई-वडिलांचे छत्र हरपले, भावाची पण साथ सुटली.. मात्र न डगमगता तिने 'नीट' मध्ये मिळवले यश!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.