ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; 3 जवान हुतात्मा, 10 हून अधिक जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 7:18 PM IST

Chhattisgarh Naxalite Attack : छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा सीमेवरील टेकलगुडेम येथे झालेल्या नक्षलवादी चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. चकमकीत 10 हून अधिक जवान जखमी झाले. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रायपूरला पाठवण्यात आलंय.

Chhattisgarh Naxalite Attack
Chhattisgarh Naxalite Attack

बस्तर (छत्तीसगड) Chhattisgarh Naxalite Attack : छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमाच्या सीमावर्ती भागात मंगळवारी (30 जानेवारी) सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. चकमकीत जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रायपूरला विमानानं हलवण्यात आलं. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली. या चकमकीत १० हून अधिक जखमी झाले असून, त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना चांगल्या उपचारांसाठी एअरलिफ्ट करण्यात आल्याचं आयजींनी सांगितलं. चकमकीत किती नक्षलवादी ठार झाले किंवा किती जखमी झाले याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही.

कुठे झाली चकमक : ज्या ठिकाणी चकमक झाली ती जागा जोनागुडा आणि अलिगुडा दरम्यान आहे. दररोज प्रमाणे टेकलगुडेम छावणीतून सैनिक शोधासाठी निघाले होते. शोध सुरू असताना, सैनिकांचा गट जोनागुडा आणि अलिगुडा दरम्यान पोहोचताच, आधीच घात करून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. बस्तरचे आयजी पी सुंदरराज म्हणाले की, ज्या भागात चकमक झाली तो भाग घनदाट जंगल आहे. 2021 मध्ये याच भागात नक्षलवाद्यांनी एका हल्ल्यात 23 जवानांना हुतात्मा केलं होतं.

नक्षलवाद्यांना छावणी बांधण्याची भीती : नक्षलवाद्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आणि त्यांची हालचाल थांबवण्यासाठी टेकलगुडेममध्ये सैनिकांची छावणी बांधण्यात आली होती. छावणी बांधल्यापासून नक्षलवादी दहशतीत होते. बस्तरच्या आयजीच्या म्हणण्यानुसार, नक्षलवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक छावणी उभारण्यात आली, ज्याचा फायदा सैनिकांना होत होता. छावणी बांधल्यापासून नक्षलवाद्यांमध्ये भीती होती.

तीन जवान हुतात्मा : छावणीच्या उभारणीनंतर सैनिक जोनागुडा आणि अलीगुडा भागात, जे पूर्वी नक्षलग्रस्त भाग होते, तेथे शोधासाठी जाऊ लागले. मंगळवारीही एसटीएफ आणि डीआरजीचे जवान नियमित शोधासाठी निघाले होते. शोधासाठी बाहेर पडलेल्या जवानांवर नक्षलवाद्यांनी घात लावून हल्ला केला. हल्ला होताच जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले तर 10 हून अधिक जवान जखमी झाले. जखमी जवानांना तातडीने हेलिकॉप्टरनं रायपूरला नेण्यात आलं. जवानांनी केलेल्या गोळीबारात किती नक्षलवादी मारले गेले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

2021 मध्ये टेकलगुडेममध्ये 23 जवान हुतात्मा : एप्रिल 2021 मध्ये टेकलगुडेममध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 23 जवान शहीद झाले होते. त्यावेळी नक्षलविरोधी अभियानाचा भाग म्हणून जोनागुडा आणि अलिगुडा भागात शोधमोहीम राबवण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत 23 जवान शहीद झाले, तर नक्षलवाद्यांनी जवानांची शस्त्रंही लुटली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करू, असं सांगितलं होतं.

हे वाचलंत का :

  1. सुकमात मोठा नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचा जवान हुतात्मा, मुख्यमंत्री विष्णुदेव साईंनी व्यक्त केला शोक
  2. छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; 150 नक्षलवाद्यांनी जाळली २० वाहनं, कोट्यवधींच नुकसान
  3. पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय; गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.