तरुणीनं मित्रांच्या मदतीनं टीव्ही अँकरचं केलं अपहरण, पोलिसांनी अटक केल्यानंतर सत्य आलं समोर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 10:14 PM IST

फाईल फोटो

Abduction of anchor : दूरचित्रवाणी वाहिनीच्या अँकरचं अपहरण केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका तरुणीला हा अँकर मुलगा आवडल्यानं तिने लग्नाचा हट्ट करत त्याचं अपहरण केलं. या अँकरच्या तक्रारीनंतर तरुणीला अटक करण्यात आली.

हैदराबाद : Abduction of anchor : हैदराबादच्या उप्पलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उप्पल पोलिसांनी भोगिरेड्डी त्रिशा नावाच्या तरुणीला प्रणव या दूरचित्रवाणी वाहिनीच्या अँकरचं अपहरण केल्याप्रकरणी अटक केली आहे. भोगिरेड्डी त्रिशा ही व्यावसायिक आहे. तिनं प्रणवच्या मॅट्रिमोनिअल प्रोफाइलवरून ऑनलाइन स्कॅमर्सनी तयार केल्याचं सांगितलं जात आहे. प्रणवचं प्रोफाईल पाहून त्रिशा त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर लग्नाच्या आशेनं त्रिशानं प्रणवचं अपहरण केलं. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.

वैयक्तिक डेटाचा वापर : डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवणाऱ्या आणि पाच स्टार्ट-अप कंपन्यांची स्थापना करणाऱ्या त्रिशाला ऑनलाइन मॅट्रिमोनी पोर्टलवर प्रणवची प्रोफाइल आवडली. मात्र, प्रणवनं काल्पनिक प्रोफाइल तयार केल्याचं तिला नंतर कळलं. असं असतानाही तिने लग्न करणार तर फक्त प्रणवसोबतच असं त्रिशानं ठरवलं. त्यानंतर त्रिशानं अँकर प्रणवला कायमचा आपला बनवण्यासाठी मोठा निर्णय घेतला.

मित्रांच्या मदतीने प्रणवचं अपहरण : त्रिशानं पोलिसांना सांगितलं की, ती भारत मॅट्रीमोनीमध्ये प्रणवला भेटली होती. त्याच्याशी बोलणंही करत असे. मात्र, नंतर अचानक बोलणं बंद झालं. त्रिशाला वाटलं की प्रणव तिच्या भावनांशी खेळत आहे. त्यानंतर तिनं प्रणवशी लग्न करण्याचा विचार केला. त्यानंतर प्लॅन करत तिनं मित्रांच्या मदतीनं प्रणवचं अपहरण केलं.

लग्न करण्यासाठी आग्रह धरला : प्रणवचे अपहरण केल्यानंतर त्रिशानं त्याला रात्रभर एका खोलीत ठेवलं. तिनं तिच्याशी लग्न करण्यासाठी आग्रह धरला. परंतु, हे प्रणवला मान्य नसल्यानं त्यानं प्रयत्न करून कशीतरी 11 फेब्रुवारी रोजी प्रणवची त्रिशाच्या कैदेतून सुटका करून घेतली. त्यानंतर तो त्यानं उप्पल पोलिसांशी संपर्क साधला. त्यानं आपल्यासोबत घडलेली संपूर्ण घटना त्यांना सांगतली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्रिशाला अटक केली.

हेही वाचा :

1 शिर्डी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिष्ठा पणाला; उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच

2 माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी पंचतत्वात विलीन, शासकीय इतमामात अंतिम संस्कार

3 शून्यातून विश्व निर्माण करून वडिलांच्या पायी ठेवेल, तीच माझी सेवा असेल-सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.