ETV Bharat / bharat

संदेशखळी लैंगिक छळ प्रकरणी सुप्रीम कोर्टात 19 फेब्रुवारीला सुनावणी, आतापर्यंत 18 जणांना अटक

author img

By PTI

Published : Feb 18, 2024, 11:02 PM IST

Sandeshkhali Violence
Sandeshkhali Violence

Sandeshkhali Violence : पश्चिम बंगालमधील संदेशखळी गावात महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 19 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्ना तसंच न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली Sandeshkhali Violence: पश्चिम बंगालमधील संदेशखळी गावात महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 19 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बी.व्ही नागरत्ना तसंच न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. संदेशखळी लैंगिक हिंसाचार प्रकरणाची सुनावणी 16 फेब्रुवारीला करण्याचं न्यायालयानं मान्य केलं होतं. संदेशखळी लैंगिक हिंसाचाराचा तपास पश्चिम बंगालच्या सीबीआय किंवा एसआयटीकडं सोपवावा, अशी मागणी याचिकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडं केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याचं देखील आवाहन त्यांनी न्यायलयाला केलं होतं. मात्र न्यायालयानं त्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

  • शाहजहान शेख फरार : संदेशखळी येथील महिलांनी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. शाहजहान शेख महिलांना वासनेचा शिकार बनवायचा, असं महिलांचं म्हणणं आहे. मात्र, रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या छापेमारीनंतर शाहजहान शेख फरार आहे.

आतापर्यंत 18 जणांना अटक : जमीन बळकावणं तसंच महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी तीन मुख्य आरोपी आहेत. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. TMC नेते शिबाप्रसाद हाजरा तसंच उत्तम सरदार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

लैंगिक छळ प्रकरणाबाबत गदारोळ : संदेशखळी लैंगिक छळ प्रकरणाबाबत 16 फेब्रुवारीला बराच गदारोळ झाला होता. भाजपाच्या शिष्टमंडळानं संदेशखळीत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले होतं. भाजपाचे कार्यकर्ते परतल्यानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संदेशखळीत जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांनाही रोखलं होतं. यावरून काँग्रेस कार्यकर्ते, पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर अधीर रंजन चौधरी रामपूरमध्ये संपावर बसले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, संदेशखळीची खरी घटना काय आहे? हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे.

संदेशखळी प्रकरणाला हिंदू-मुस्लिम जातीय घटना दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ममता अतिशय हुशारीनं त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. काल विधानसभेत त्यांनी केलेल्या भाषणात हे स्पष्ट झालं आहे. याचं उत्तर ममता बॅनर्जी यांना द्यावं लागेल. शाहजहानसह त्याचे समर्थक सर्व टीएमसीचे कार्यकर्ते आहेत.- अधीर रंजन चौधरी, खासदार, काँग्रेस

भाजपाला रोखलं : अधीर रंजन चौधरी यांच्या आगोदर भाजपाच्या 6 सदस्यीय टीमला संदेशखळीला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, आम्हाला पीडित बहिणींना न्याय मिळवून द्यायचा आहे. ज्या तत्परतेनं आम्हाला रोखले होतं, त्याच तत्परतेनं आरोपी पकडले गेले असते, तर हा दिवस आम्हाला पाहावा लागला नसता. शेखचे गुंड महिलांना त्रास देत होते. भाजप खासदार सुनीता दुग्गल म्हणाल्या की, बंगालमध्ये गुंडांचं सरकार आहे. संदेशखळी येथील पीडित महिलांशी आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो. आमच्याशी बोलत असलेल्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. आम्ही बंगालच्या राज्यपालांना भेटून संपूर्ण माहिती देऊ.

हे वाचलंत का :

  1. मणिपूरमध्ये जमावाचा एसपी कार्यालयावर हल्ला, पोलीस ठाण्यावरही दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा
  2. हिंसाचार केला तर NSA लावला जाईल, दंगलीनंतर हल्द्वानीमध्ये संचारबंदी कायम
  3. अतिक्रमणाविरोधात कारवाईनंतर हल्द्वानीमध्ये उसळली दंगल; संचारबंदी लागू, पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.