ETV Bharat / bharat

"आपके साथ रहेंगे अब इधर-उधर नहीं जाएंगे"; नितीश कुमारांच्या विधानावर पंतप्रधानांना हसू आवरेना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 6:12 PM IST

PM Narendra Modi Bihar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औरंगाबाद येथील सभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा दावा केलाय. "आता फक्त तुमच्यासोबतच राहणार, इकडं-तिकडं जाणार नाही," असं नितीश कुमार कार्यक्रमात म्हणाले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हसू आवरलं नाही.

बिहारचे नितीश कुमारांनी आणि पंतप्रधान मोदी
बिहारचे नितीश कुमारांनी आणि पंतप्रधान मोदी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

औरंगाबाद (बिहार) PM Narendra Modi Bihar Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गया विमानतळावर स्वागत केलं. दरम्यान, आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या 'गॅरंटी'वर पंतप्रधानांना हसू आवरलं नाही. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

नरेंद्र मोदींचं केलं कौतुक : औरंगाबाद शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला संबोधित करताना नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलंय. नितीश कुमार म्हणाले, "आपण या अगोदरही येथे आले होतात. मात्र, त्यावेळी मी मध्येच गायब झालो होतो. पण आता तसं होणार नाही. मी तुमच्यासोबतच असेन." त्यावेळी पंतप्रधानांना हसू आवरता आलं नाही. तसंच, "आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही तुमच्यासोबतच राहू. इकडं-तिकडं होणार नाही तुम्ही इथे विकास करत रहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत," असही नितीश कुमार यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा : "बिहारमध्ये समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकल्प महत्त्वाचे आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत ही आनंदाची बाब आहे. त्या योजनांवर वेगाने काम सुरू आहे ही आनंदाची बाब आहे. आज मी पंतप्रधानांचं अभिनंदन करतो की, ते पुन्हा बिहारमध्ये आले आहेत. आम्ही 2005 पासून एकत्र आहोत आणि एकत्र खूप काम केलं आहे. यापूर्वी कुठंही काम झालं नव्हतं," असंही नितीश कुमार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या योजनांची पायाभरणी : "बिहार खूप प्रगती करत आहे. आज रेल्वे, रस्ते बांधणी आणि नमामि गंगा या महत्त्वाच्या योजनांची पायाभरणी झाली. अमास ते दरभंगा हा नवीन चौपदरी बांधावा लागणार आहे. त्याचबरोबर अमास ते रामनगर विभागापर्यंत पायाभरणी होत आहे. दानापूर बिहता दरम्यान चौपदरी उन्नत रस्त्याची योजना महत्त्वाची आहे. ती सुरू व्हावी," अशी मागणीही नितीश कुमार यांनी यावेळी केली.

हेही वाचा :

1 ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, काय झाली चर्चा?

2 हिमाचल प्रदेश आमदार अपात्र प्रकरण : विक्रमादित्य सिंह यांनी घेतली अपात्र ठरलेल्या आमदारांची भेट

3 रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, चारजण जखमी, सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.