ETV Bharat / bharat

हरियाणा INLD चे अध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 8:22 PM IST

Nafe Singh Rathi Murder: रविवारी इंडियन नॅशनल लोकदलाचे (INLD) प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांच्यावर आज (25 फेब्रुवारी) जीवघेणा हल्ला झाला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. बहादूरगडमधील बाराही गेटजवळ त्यांच्या कारवर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.

Haryana INLD president Nafe Singh Rathi Murder
हत्याकांड

झज्जर (हरियाणा) Nafe Singh Rathi Murder : इंडियन नॅशनल लोक दलाचे (INLD) प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती INLD मीडिया सेलचे प्रभारी राकेश सिहाग यांनी दिली आहे. रविवारी बहादुरगडमधील बाराही गेटजवळ त्यांच्या कारवर काही बदमाशांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात नफे सिंग राठी जखमी झाले होते.

INLD प्रदेशाध्यक्षाचा मृत्यू : या हल्ल्यात नफे सिंह राठी व्यतिरिक्त 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही गोळ्या लागल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात नफे सिंग राठी यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर आय-10 कारमधून आले होते. बहादूरगडमधील बाराही गेटजवळ नफे सिंग यांच्या कारवर बदमाशांनी गोळीबार केला. चारही जखमींना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरू केला.

हेही वाचा:

  1. शिक्षिकेच्या पर्समधून 35 रुपये गायब; थयथयाट करत विद्यार्थ्यांना मंदिरात नेऊन दिली शपथ
  2. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील संप मागे, सरकार आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
  3. 'आंदोलन संपवण्यासाठी मला मारण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.