ETV Bharat / bharat

रामनगरीत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन: राम मंदिर पुजाऱ्यांनी इक्बाल अन्सारींच्या घरी जात दिल्या ईदच्या शुभेच्छा - Ram Temple Chief Priest Wishes Eid

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 10:55 AM IST

Ram Temple Chief Priest Wishes Eid : देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बाबरी मशीद आंदोलनातील आंदोलक इक्बाल अन्सारी यांच्या घरी भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Ram Temple Chief Priest Wishes Eid
रामनगरीत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन

रामनगरीत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन

लखनऊ Ram Temple Chief Priest Wishes Eid 2024 : अयोध्येत राम मंदिर बांधण्यात आल्यानं देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दुसरीकडं गुरुवारी देशभरात रमजान ईद साजीर करण्यात आली. यावेळी गंगा जमुनी संस्कृतीचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. राम मंदिराचे पुजारी आचार्य सत्येंद्रदास महाराज यांनी बाबरी मशीदीचे आंदोलक इक्बाल अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी इक्बाल अन्सारी यांनी पुष्पहार घालून पुजारी सत्येंद्र दास यांचं स्वागत केलं. यावेळी अन्सारी यांच्या कुटुंबीयांनी पुजारी यांचे आशीर्वाद घेतले.

आचार्य सत्येंद्र दास यांनी गाठलं इक्बाल अन्सारी यांचं घर : देशभरात रमजान ईदचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे मुस्लीम बांधव मशीदीत जात नमाज अदा करत आहेत. ईदचा जल्लोष साजरा करण्यात येत असताना राम मंदिराचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बाबरी मशीद आंदोलनातील आंदोलक इक्बाल अन्सारी यांच्या घरी जात त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यास आलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांचं इक्बाल अन्सारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी अन्सारी यांच्या कुटुंबीयांनी आचार्य सत्येंद्र दास यांचा आशीर्वादही घेतला.

आम्ही एकमेकांच्या सुखदुखात सहभागी : इक्बाल अन्सारी यांना ईदच्या शुभेच्छा दिल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "आज ईदचा पवित्र दिवस आहे. जसा आमच्याकडं उत्सव साजरा करण्यात येतो, तसाच मुस्लीम बांधवांमध्ये ईदचा सण साजरा करण्यात येतो. आज मी रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी इक्बाल अन्सारी यांच्या घरी आलो. मात्र जेव्हा हिंदू सण उत्सव असतात, जसं दिवाळी, होळी या सणाला इक्बाल अन्सारी हे आमच्या घरी येऊन शुभेच्छा देतात. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत असतो," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अयोध्या ही धर्माची नगरी : शुभेच्छा देताना मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, "इक्बाल अन्सारी यांचं कुटुंब सदैव सुखी आणि समृद्ध राहो. त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये." यावेळी इक्बाल अन्सारी म्हणाले की, "अयोध्या ही धर्माची नगरी आहे. आज ईद साजरी होत आहे. सण-उत्सवात अयोध्येच्या भूमीतून हिंदू-मुस्लीम बंधुभावाचा नेहमीच सद्भावनेचा संदेश दिला जातो. इथली गंगा जमुना संस्कृती सदैव अबाधित राहावी. ईदनिमित्त सर्व हिंदू बांधवांनी घरी येऊन शुभेच्छा दिल्या. राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांकडूनही आशीर्वाद मिळाले. हिंदू-मुस्लिमांमध्ये अशीच एकता सदैव असावी."

हेही वाचा :

  1. राम मंदिर निर्माण कार्याला 500 वर्षाचा संघर्ष : सरसंघचालक मोहन भागवत - Mohan Bhagwat On Ram Mandir
  2. ईदच्या दिवशी 'या'अभिनेत्रींनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, ईदच्या चांद सारखे सुंदर फोटो केले शेअर - Ramadan Eid wishes
  3. स्टार स्टडेट ईद पार्टीमध्ये सलमान खानचा रुबाब, जल्लोष करणाऱ्या चाहत्यांना केलं अभिवादन - Salman Khan Eid
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.