ETV Bharat / bharat

रांचीच्या बारमध्ये गोळीबार, डीजेची गोळी झाडून हत्या; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर - Firing in Ranchi Bar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 2:45 PM IST

DJ Murder in Bar : झारखंडमधील रांचीच्या चुटिया येथील बारमध्ये झालेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. गुन्हेगारानं बारच्या डीजेच्या छातीवर गोळी कशी झाडली हे त्यामध्ये स्पष्ट दिसतं.

रांचीच्या बारमध्ये गोळीबार, डीजेची गोळी झाडून हत्या; घटनेचा सीसीटीव्ही समोर
रांचीच्या बारमध्ये गोळीबार, डीजेची गोळी झाडून हत्या; घटनेचा सीसीटीव्ही समोर (Etv Bharat JH desk)

रांची DJ Murder in Bar : झारखंडची राजधानी रांचीत मृत्यूचं भयावह दृश्य समोर आलय. बार कर्मचाऱ्यावर गोळी झाडण्यात आलीय. गोळीबाराची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. डीजे संदीप आधीच घरी जाण्यासाठी उभा आहे, तिथं एक माणूस चेहरा झाकून बारच्या पायऱ्यांवर पोहोचतो. हातात रायफल आणि चेहऱ्यावर कापड बांधलेला तरुण तिथं पोहोचताच त्यानं संदीपच्या छातीत गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर संदीप लिफ्टजवळ पडतो, त्याचवेळी ज्यानं त्याला गोळी मारली तो बाहेर येतो आणि बाहेरुन बारवर अनेक वेळा गोळीबार करतो आणि नंतर आपल्या पांढऱ्या कारमध्ये बसून पळून जातो, असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय.

पोलिसांनी संशयितांना घेतलं ताब्यात : ही संपूर्ण घटना रांचीच्या चुटिया पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका बारमध्ये घडलीय. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी सकाळी घटनास्थळ गाठून तपास सुरू केलाय. रांचीचे एसएसपी चंदन कुमार सिन्हाही घटनास्थळी पोहोचले. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली जातेय.

नेमकं काय घडलं : रविवारी रात्री चार-पाच तरुण दारू पीत होते. त्यादरम्यान त्यांचा डीजे संदीप आणि बारमधील इतर काही कर्मचाऱ्यांशी वाद झाला. वादानंतर हाणामारी झाली पण कसंबसं प्रकरण शांत झालं. मात्र काही वेळानं बारमध्ये दारू पिणारे पाच तरुण परत आले, त्यावेळी बार बंद होता. डीजे संदीप आणि इतर कर्मचारी बारमधून बाहेर पडत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. एका तरुणानं हातातल्या रायफलनं संदीपच्या छातीत गोळी झाडली. यानंतर त्यानं बारमध्ये घुसून अनेक राऊंड फायर केले आणि नंतर घटनास्थळावरुन पळ काढला. सध्या पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

  1. मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील पेट्रोलपंपावर दरोडेखोरांकडून गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद - malegaon petrol pump fire
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.