ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवालनंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले आतिशींच्या घरी, आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी बजावणार नोटीस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 3:42 PM IST

crime branch team reached minister atishi house in delhi
आतिशी यांच्या घरी पोहोचले गुन्हे शाखेचे पथक

AAP MLAs horse trading Case : आम आदमी पार्टीनं (आप) भाजपावर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक दिल्ली सरकारच्या मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेत्या आतिशी यांच्या निवासस्थानी पोहोचलं आहे.

आतिशी यांच्या घरी पोहोचले गुन्हे शाखेचे पथक

नवी दिल्ली AAP MLAs horse trading Case : देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात राजकारण शिगेला पोहोचलंय. आप आमदार हॉर्स ट्रेडिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई सुरूच आहे. शनिवारी या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी नोटीस बजावली होती. त्यानंतर आज (4 फेब्रुवारी) एसीपीच्या नेतृत्वाखाली, गुन्हे शाखेचे पथक मंत्री आतिशी यांना नोटीस बजावण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहे.

आतिशी यांचे भाजपावर गंभीर आरोप : गेल्या आठवड्यात दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आम आदमी पार्टीच्या आमदारांना आमिष दाखवून खरेदी केल्याचा आरोप केला होता. आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होतं की, "भाजपा नेत्यांनी दिल्लीतील सात आप आमदारांशी संपर्क साधला. प्रत्येकी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली. भाजपा नेत्यांना दिल्लीतील सत्ताधारी आपचे 21 आमदार फोडायचे आहेत. आतापर्यंत सात आमदारांशी संपर्क साधल्याची माहिती आहे." तसंच यावेळी आतिशी यांनी भाजपावर पक्ष फोडण्याचं राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोपही केला होता.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बजावली नोटीस : दरम्यान, या प्रकरणी शनिवारी (3 फेब्रुवारी) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाच तासांच्या गोंधळानंतर गुन्हे शाखेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती. मुख्यमंत्र्यांना बजावलेल्या नोटीसमध्ये गुन्हे शाखेने सांगितले आहे की, भाजपा नेत्यांनी ज्या सात आमदारांशी संपर्क साधला आणि आमिष दाखवले ते कोण आहेत? हे तुम्ही तीन दिवसांत सांगा."

काय आहे प्रकरण : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजपा 'आप'च्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आपचे 21 आमदार फोडण्याची योजना आखत असल्याचंही केजरीवाल म्हणाले होते. यासंदर्भात त्यांच्या सात आमदारांशीही संपर्क साधण्यात आला होता, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचं प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.

हेही वाचा -

  1. Atishi Attack On BJP : आम्ही ईडी, सीबीआयला घाबरत नाही', आप'च्या मंत्री आतिशी यांचा भाजपवर हल्ला
  2. Delhi Cabinet Reshuffled : सौरभ भारद्वाज, आतिशी मार्लेना घेणार शपथ; केजरीवाल सरकारमध्ये होणार सामील
  3. AAP On Operation Lotus देशभरातील भाजपच्या ऑपरेशन लोटसवरील 6300 कोटींच्या खर्चाची सीबीआय चौकशी व्हावी, आपची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.