ETV Bharat / bharat

Atishi Attack On BJP : आम्ही ईडी, सीबीआयला घाबरत नाही', आप'च्या मंत्री आतिशी यांचा भाजपवर हल्ला

author img

By

Published : Jul 8, 2023, 3:18 PM IST

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, मनीष सिसोदिया 2005 मध्ये पत्रकार असताना त्यांनी स्वत:च्या कमाईने घर घेतले होते. तेव्हा ते राजकारणात नव्हते. त्यामुळे अबकारी धोरणाच्या कमाईतून त्यांनी हे घर कसे बांधले हे भाजपने सांगावे, असा सवाल त्यांनी केला.

Atishi
आतिशी

नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी शनिवारी भाजपवर निशाणा साधला आहे. त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, 'भाजपचे लोक कालपासून आप नेते मनीष सिसोदिया यांच्याविरोधात खोट्या बातम्या पसरवत आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मनीष सिसोदिया यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मनीष सिसोदिया आणि त्यांच्या पत्नीची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियापासून वृत्तवाहिन्यांपर्यंत पसरवल्या जात आहेत'.

'सिसोदियांनी स्वतःच्या कमाईने घर घेतले' : आतिशी यांनी ईडीचा आदेश दाखवला आणि सांगितले की, 'ईडीने आपल्या आदेशात पंतप्रधान मोदींचे खोटे उघड केले आहे. ईडीची ही कागदपत्रे वाचली तर कळते की 81,49,738 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया 2005 मध्ये पत्रकार असताना त्यांनी स्वतःच्या कमाईने हे घर घेतले होते. तेव्हा ते राजकारणात नव्हते. अबकारी धोरणाच्या कमाईतून हे घर कसे बांधले, हे भाजपने सांगावे', असे त्या म्हणाल्या.

'आम्ही सीबीआय आणि ईडीला घाबरत नाही' : आतिशी म्हणाल्या की, 'भाजप आणि मोदींना मनीष सिसोदियांना बदनाम करायचे आहे. मनीष सिसोदिया दिल्लीतील लाखो गरीब मुलांचे भविष्य घडवत आहेत, हे त्यांना सहन होत नाही. त्यांना मनीष सिसोदियांना सीबीआय-ईडीची इतकी भीती दाखवायची आहे की ते अखेरीस भाजपमध्ये सामील होतील. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही सीबीआय आणि ईडीला बिलकूल घाबरत नाही'.

ईडीची कागदपत्रे पाहिल्यानंतर भाजप आणि पंतप्रधानांनी सिसोदिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. आतापर्यंत मनीष सिसोदियांनी कोणतीही मालमत्ता किंवा रोख रक्कम घेतल्याचा कोणताही पुरावा सरकारकडे नाही. मात्र तरीही त्यांनी गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना तुरुंगात डांबले आहे- मंत्री आतिशी

  • प्रधान मंत्री जी, जब आपको मनीष सिसोदिया के ख़िलाफ़ कुछ नहीं मिला तो आपने ED के ज़रिये मनीष को बदनाम करना चालू कर दिया?

    आपकी ED शाम से टीवी चैनलों पर झूठी खबरें चलवा रही है कि मनीष सिसोदिया की 52 करोड़ की संपत्ति ज़ब्त की गयी। ED ने असल में जो संपत्ति ज़ब्त की है, उसके काग़ज़ात… https://t.co/zabjAPfwH3

    — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केजरीवालांची मोदींवर टीका : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल म्हणाले की, ईडीने केवळ 80 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ती देखील 2018 पूर्वी मिळवलेली होती. तेव्हा अबकारी धोरणही बनले नव्हते. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'पंतप्रधानांना मनीष सिसोदिया यांच्या विरोधात काहीही सापडले नाही, तेव्हा त्यांनी ईडीच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली?'

हेही वाचा :

  1. Delhi Liquor Scam : ईडीची मोठी कारवाई, मनीष सिसोदियांची करोडोंची मालमत्ता जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.