ETV Bharat / bharat

Delhi Cabinet Reshuffled : सौरभ भारद्वाज, आतिशी मार्लेना घेणार शपथ; केजरीवाल सरकारमध्ये होणार सामील

author img

By

Published : Mar 8, 2023, 10:45 AM IST

Updated : Mar 8, 2023, 12:41 PM IST

सौरभ भारद्वाज आणि आतिशी मार्लेना यांचा गुरुवारी केजरीवाल सरकारमध्ये समावेश होणार आहे. उद्या 9 मार्चला दोघेही एकाच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतील. एलजी व्हीके सक्सेना यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी होईल.

Delhi Cabinet Reshuffled
सौरभ भारद्वाज, आतिशी मार्लेना यांचा शपथविधी

नवी दिल्ली : केजरीवाल सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पार पडत आहे. आपचे आमदार सौरभ भारद्वाज आणि आतिशी मार्लेना हे उपराज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्या उपस्थितीत शपथ घेतील. माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात त्यांची पदे रिक्त झाली होती.

उपराज्यपालांकडे यादी पाठवली : ही रिक्त पदे भरण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 1 मार्च रोजी त्यांच्या दोन आमदारांची नावे उपराज्यपालांकडे पाठवली होती. लेफ्टनंट गव्हर्न व्हीके सक्सेना यांनी ती मान्य करून पुढील मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवली होती. नवीन मंत्री म्हणून सौरभ भारद्वाज आणि आतिशी मार्लेना यांच्या नावांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यानंतर ९ मार्च रोजी दोन्ही आमदार पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

आतिशी मार्लेना पहिल्या महिला मंत्री : सौरभ भारद्वाज हे आम आदमी पक्षाकडून ग्रेटर कैलास विधानसभेतून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. आमदार सौरभ भारद्वाज हे आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत. कालकाजीमधून निवडणूक जिंकून आतिशी मार्लेना पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. सौरभ भारद्वाज सध्या दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. 2013 मध्ये आम आदमी पक्षाच्या पहिल्या सरकारमध्ये ते काही दिवस परिवहन मंत्रीही होते. आतिशी मार्लेना हे मनीष सिसोदिया यांचे शिक्षण सल्लागार आहेत. आतिशी मार्लेना या केजरीवाल सरकारच्या मंत्रिमंडळातील पहिल्या महिला मंत्री असतील.

कोणते खाते मिळणार ? : मनीष सिसोदिया जे विभाग सांभाळत होते. त्यापैकी वित्त आणि नियोजन यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सध्या मंत्री कैलाश गेहलोत सांभाळत आहेत. सौरभ भारद्वाज यांच्याकडे वीज-पाणी, सार्वजनिक बांधकाम विभाग, दक्षता विभाग, गृह विभाग, सेवा यासारखे खाते सोपवले जाऊ शकते. तर शिक्षण, आरोग्य, पर्यटन, कामगार, महिला आणि बालविकास ही आतिशी मार्लेना यांना देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Priyanka Gandhi News: बिग बॉस फेम अर्चनाच्या आरोपानंतर मोठे नाट्य...प्रियंका गांधी यांच्या पीए संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Last Updated :Mar 8, 2023, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.