ETV Bharat / bharat

Car Hit in Market : बेफाम वेगातील कारनं बाजारात खरेदी करणाऱ्यांना चिरडलं, महिलेचा मृत्यू, 10 जण जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 9:27 AM IST

Etv Bharat
Etv Bharat

Car Hit in Market : अनियंत्रित कारमुळं बुधवारी रात्री दिल्लीत विचित्र अपघात झाला. मयूर विहार फेज-3 च्या मार्केटमध्ये खरेदी करणाऱ्या लोकांना भरधाव कारनं चिरडलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.

अनियंत्रीत कारनं बाजारात खरेदी करणाऱ्यांना चिरडलं

नवी दिल्ली Car Hit in Market : पूर्व दिल्लीतील मयूर विहार फेज 3 भागात एका आठवडी बाजारात भरधाव कारनं अनेकांना चिरडलं. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. त्यांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी 22 वर्षीय महिलेला मृत घोषित केलं. या अपघातात कार चालकही जखमी झालाय. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलंय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यात भरधाव कार लोकांना चिरडताना दिसत आहे. अपघातात बळी पडलेली महिला सीता देवी आपल्या कुटुंबासह खोडा कॉलनीत राहत होत्या. त्या बाजारात खरेदीसाठी आल्या असताना अपघातात मृत्यू झाला.

अपघातात 10 जण जखमी : पूर्व दिल्लीचे डीसीपी अपूर्व गुप्ता यांनी सांगितलं की, "बुधवारी रात्री 9:30 च्या सुमारास मयूर विहार फेज 3 परिसरातील बुध बाजार इथं एका वेगवान कारनं अनेकांना धडक दिली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. त्यात बहुतांश महिलांचा समावेश आहेत. यातील सर्व जखमींना जवळच्या लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येतंय. या अपघातात कार चालकही जखमी झाला. त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आरोपीच्या कारचंही नुकसान झालं असून ती कार जप्त करण्यात आली. पोलिसांची पुढील कारवाई सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्थानिक लोकप्रतिनिधींची रुग्णालयात धाव : अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि पूर्व दिल्लीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांनीही जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटल गाठलं. यावेळी ते म्हणाले की, "दिल्लीत भरधाव वेगातील वाहने सातत्यानं लोकांचा बळी घेत आहे. त्यामुळं ते थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात."

हेही वाचा :

  1. कास पठारावर फिरायला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; कार दुभाजकाला धडकून दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
  2. बिहारमध्ये भीषण अपघात; दुचाकीला धडक देऊन स्कॉर्पिओची ट्रकला धडक, 9 जणांचा मृत्यू
  3. उत्तर प्रदेशात मोठा अपघात; पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.