उत्तर प्रदेशात मोठा अपघात; पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 1:02 PM IST

Accident in Kasganj

Accident in Kasganj : उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये मोठा अपघात झालाय. एक वाहन वाचवण्याच्या प्रयत्नात भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली तलावात उलटली. या अपघातात 15 भाविकांचा मृत्यू झालाय.

कासगंज (उत्तर प्रदेश) Accident in Kasganj : उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांनी भरलेलं ट्रॅक्टर ट्रॉली वाहनाची धडक टाळण्याच्या प्रयत्नात तलावात पडलीय. ट्रॅक्टरची ट्रॉली तलावात पडून झालेल्या या भीषण अपघातात 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू झालाय. यामुळं परिसरात एकच खळबळ उडालीय.

अपघातात 15 जणांचा भाविकांचा मृत्यू : या घटनेची माहिती मिळताच प्रवाशांसह पोलिसांनी बचावकार्य सुरु केलंय. मात्र, तोपर्यंत 7 मुलं आणि 8 महिलांचा या अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातानं प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

चौघांची प्रकृती चिताजनक : ही घटना कासगंज जिल्ह्यातील पटियाली कोतवाली भागातील दरियावगंज पटियाली रस्त्याच्या मधोमध असलेल्या गढैया गावाजवळ घडलीय. एटा जिल्ह्यातील जैथरा पोलीस स्टेशन हद्दीतील छोटे कास गावात राहणारे लोक पौर्णिमा असल्यामुळं कासगंजच्या पटियाली तहसील भागातील कादरगंज गंगा घाटावर गंगा स्नान करण्यासाठी जात होते. त्यानंतर दर्यावगंज परिसरातील गढिया गावाजवळ वाहनाची धडक टाळण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील नियंत्रण सुटून ती तलावात पडली. या अपघातात 7 मुलं आणि 8 महिलांचा मृत्यू झाला. चार गंभीर जखमी मुलांना उच्च केंद्रात पाठवण्यात आलंय. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री योगींकडून अपघाताबद्दल शोक व्यक्त : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अपघाताबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांनी या संदर्भात X (पुर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत त्यात लिहिलय, "कासगंज जिल्ह्यात झालेल्या अपघातात जीवितहानी अत्यंत हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. सर्व जखमींवर योग्य ते मोफत उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या आत्म्याला शांती आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे ही भगवान श्री राम चरणी प्रार्थना."

हेही वाचा :

  1. ट्रक आणि रिक्षाची भीषण धडक; 9 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर
  2. मंचरजवळ कार-टेम्पो-कंटेनरचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.