ETV Bharat / bharat

कोविशील्ड साइड इफेक्ट्स: नागरिकांना लस नुकसान भरपाईसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Covishield Side Effects Plea

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 4:59 PM IST

कोविशील्ड साइड इफेक्ट्स
कोविशील्ड साइड इफेक्ट्स

Covishield Side Effects Plea - कोविशील्ड लसीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे दुष्परिणाम, जोखीम घटक तपासण्यासाठी AIIMS, दिल्लीच्या वैद्यकीय तज्ञांचं एक पॅनेल तयार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नुकतीच कोविड लसिमुळं दुष्परिणाम होत असल्याची कबुली कंपनीनं दिली आहे.

नवी दिल्ली Covishield Side Effects Plea : कोविड लसींचे दुष्परिणाम शोधण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथील वैद्यकीय तज्ज्ञांचं एक पॅनेल तयार करण्याचे निर्देश द्यावेत अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या पॅनेलच्या अध्यक्षपदी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश असावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. Covishield लसीचे दुष्परिणाम आणि त्याचे जोखीम घटक तपासले जावेत अशीही या याचिकेत मागणी केली आहे.

वकील विशाल तिवारी यांनी केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, अलीकडेच हे उघड झालं आहे की कोविशील्ड लसीमुळे काही प्रकरणांमध्ये दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्याचे विकसक ॲस्ट्राझेनेका यांनी म्हटलं आहे की कोविड-19 विरुद्धची त्यांची AZD1222 लस, जी कोविशील्ड म्हणून भारतात परवान्याअंतर्गत बनविली गेली होती. यामुळे प्लेटलेट संख्या कमी होणं आणि "अत्यंत दुर्मीळ" प्रकरणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, असं कंपनीनं कबुल केलं होतं. “AstraZeneca ने लस आणि थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) यांच्यात संबंध आहे, ही बाब स्वीकारली आहे.

यामध्ये अशी वैद्यकीय स्थिती निर्माण होते, जी प्लेटलेट्सची असामान्यपणे पातळी कमी करते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार करते. AstraZeneca चे लस फॉर्म्युला पुणेस्थित लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला कोविशील्डच्या निर्मितीसाठी कोरोनाव्हायरस साथीच्या काळात परवाना देण्यात आला होता. कोविशील्डचे 175 कोटींहून अधिक डोस भारतात दिले गेले आहेत”, असं याचिकेत म्हटलं आहे.

याचिकेत पुढे म्हटलं आहे की कोविड 19 नंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि लोक अचानक कोसळले आहेत. तरुणांमध्येही हृदयविकाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने या समस्येकडे प्राधान्याने पाहिलं पाहिजे जेणेकरून भविष्यात भारतीय नागरिकांच्या आरोग्यास आणि जीवनास कोणताही धोका उद्भवू नये”, असंही याचिकेत म्हटलं आहे. कोविड 19 दरम्यान लसीकरण मोहिमेमुळे गंभीरपणे अपंगत्व आलेल्या नागरिकांसाठी लस नुकसान भरपाई प्रणाली स्थापन करण्यासाठी केंद्राला निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकारला निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. कोविड 19 दरम्यान त्यांना देण्यात आलेल्या कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे गंभीरपणे अपंग किंवा मरण पावलेल्या लोकांना भरपाई द्यावी अशी भूमिका याचिकाकर्त्यानं घेतली आहे.

हेही वाचा..

  1. Mental Health In a Post-Covid कोविड नंतरचे मानसिक आरोग्य चिंताजनक; जागतिक अभ्यासाचा निष्कर्ष
  2. कोरोना लसीमुळे दुष्परिणाम म्हणून 'हा' गंभीर विकार होतो, वैद्यकीय तज्ज्ञांची धक्कादायक माहिती - COVID vaccine side effects
  3. औषधी कंपन्या लुटारू झाल्यात, आयोडीन मॅन पद्मश्री डॉ चंद्रकांत पांडव यांनी व्यक्त केली खंत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.