ETV Bharat / bharat

सोलापूरकरांना रेल्वेचं गिफ्ट : मुंबई ते हुबळी आणि सोलापूर ते हुबळी विशेष अनारक्षित रेल्वे सेवा सुरू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 10:58 AM IST

Mumbai To Hubli Train
संग्रहित छायाचित्र

Mumbai To Hubli Train : मध्य रेल्वेनं मुंबई ते हुबळी आणि सोलापूर ते हुबळी अशा विशेष अनारक्षित रेल्वे सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात यात्रांना सुरुवात झाल्यानं या विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत.

मुंबई Mumbai To Hubli Train : मध्य रेल्वेनं प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते हुबळी आणि सोलापूर ते हुबळी अर्थात महाराष्ट्रातून दक्षिण भारतात आणि दक्षिण भारतातून महाराष्ट्रात अशा विशेष अनारक्षित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील सुट्ट्या लक्षात घेता प्रवाशांची गर्दी वाढत आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात विविध जत्रा आणि सण या काळामध्ये अत्याधिक आहे. आणि त्यामुळेच मध्य रेल्वेकडून मुंबई ते दक्षिण भारतातील हुबळी, बेळगाव या ठिकाणी प्रवाशांना जाण्या येण्यासाठी विशेष अनारक्षित अशा 16 गाड्यांची सेवा आजपासून सुरू केली जात आहे.

  • 1171 ही ट्रेन 3 फेब्रुवारी 2024 पासून बारा वाजून 40 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणार आहे, तर ती दुसऱ्या दिवशी पाच वाजता हुबळी या ठिकाणी पोहोचणार आहे.
  • 1172 ही विशेष ट्रेन 4 फेब्रुवारी 2024 रोजी 21 वाजून 30 मिनिटांनी हुबळीतून मुंबईकडं प्रस्थान करेल. तर मुंबईला दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता पोहोचणार आहे.
  • या गाडीचा थांबा दादर, कल्याण, लोणावळा आणि पुणे तसेच दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, मिरज, बेळगाव आणि लोंढा आणि धारावा इथं असणार आहे.
  • ट्रेन क्रमांक 1173 ही 3 फेब्रुवारी 2024 रोजी एक वाजून 30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सहा वाजून वीस मिनिटांनी हुबळी या ठिकाणी पोहोचणार आहे.
  • 1174 ही विशेष ट्रेन चार फेब्रुवारी 2024 रोजी रात्री आठ वाजता हुबळी येथून निघेल. दुसऱ्या दिवशी एक वाजून 35 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे.
  • 100175 ही अनारक्षित विशेष गाडी तीन फेब्रुवारी 2024 येथून सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी सोलापूर येथून सुटेल तर दुसऱ्या दिवशी चार वाजता हुबळी या ठिकाणी पोहोचेल. 100176 ही विशेष ट्रेन 4 फेब्रुवारी 2024 रोजी आठ वाजता हुबळी येथून निघेल तर दुसऱ्या दिवशी चार वाजता सोलापूर या ठिकाणी पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर प्रवाशांनी तपशील पाहण्याची सूचना देखील करण्यात आलेली आहे. www.enquiry.indiarail.gov.in या संकेतस्थळावर प्रवाशांनी तपशील पहावा, असंही त्यांनी यावेळी कळवलं आहे.

हेही वाचा :

  1. भारतीय रेल्वेच्या 40,000 बोगी वंदे भारत कोचमध्ये रूपांतरित करणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
  2. दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर रुळाला तडा; ट्रॅकमॅनच्या सतर्कतेनं मोठी दुर्घटना टळली, पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.