ETV Bharat / bharat

हे बिहार आहे भावा! भोजपूरमध्ये डीजेच्या तालावर नाचत निघाली अनोखी अंत्ययात्रा, आनंद साजरा करण्यामागे आहे खास कारण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 9:27 PM IST

Bhojpur News : बिहारच्या भोजपूरमध्ये एक अनोखी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. यात सर्वजण डीजेच्या तालावर नाचताना आणि गुलालाची उधळण करताना दिसले. ही अनोखी अंत्ययात्रा पाहून काही लोक याला विचित्र म्हणत आहेत.

Bhojpur News
Bhojpur News
अनोखी अंत्ययात्रा

भोजपूर (बिहार) Bhojpur News : बिहारच्या भोजपूरमध्ये एका वृद्धाच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले लोक शोक करण्याऐवजी आनंद साजरा करताना दिसले. वयाच्या 108 व्या वर्षी एका वृद्धाचं निधन झालं. यानंतर कुटुंबातील सदस्य उत्सवासारखं डीजेच्या तालावर नाचले. होळीचे गाणे वाजवत अंत्यविधीसाठी अंत्ययात्रा काढली.

फुहाद होळीच्या गाण्यावर कुटुंबीयांचा डान्स : या अंत्ययात्रेत डीजेवर फुहाद होळी हे भोजपुरी गाणं वाजवलं जात होतं. या गाण्याच्या तालावर मृतांचं कुटुंबीय आणि नातेवाईक एकमेकांवर गुलाल उधळत जोमानं नाचत होतं. तर त्याच्या पाठीमागे एक ट्रॅक्टर रंगीबेरंगी फुग्यांनी सजवून त्यात मृतदेह ठेवून अंत्ययात्रा काढली जात होती. यावेळी या मार्गावरुन जाणाऱ्या लोकांना हे पाहून धक्काच बसला. त्यांनी बराच वेळ ही अंत्ययात्रा पाहिली.

वयाच्या 108 व्या वर्षी वृद्धाचा मृत्यू : ही संपूर्ण घटना रविवारी दुपारी कृष्णगड परिसरातील माहुली गंगा घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा बसंतपूर गावात राहणारे सिद्धेश्वर पंडित यांचं वयाच्या 108 व्या वर्षी निधन झालं. त्यांचं कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव माहुली गंगा घाटावर घेऊन जात असताना ही अनोखी अंत्ययात्रा रस्त्यानं जाणाऱ्यांनी पाहिली आणि अनेकांनी या अंत्ययात्रेला विचित्रही म्हटलंय.

"माझ्या आजोबांचं वयाच्या 108 व्या वर्षी निधन झालं. ते इतके दिवस जगले याचा मला आनंद आहे. आमचा आनंद व्यक्त करत आम्ही त्यांना डीजेच्या सहाय्यानं अखेरचा निरोप देत आहोत." - रोहित कुमार, मृताचा नातू

डीजेसह निघाली अंत्ययात्रा : मृताचा मुलगा आणि इतर नातेवाईकांना या अंत्ययात्रेबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, त्यांच्या मृत्यूनंतर ते दुःखी नसून आनंदी आहेत. आजच्या काळात शंभर वर्षे कोणीही जगत नाही. वयाच्या 108 व्या वर्षी सिद्धेश्वर पंडित यांचं निधन झालं. त्यामुळं उत्सव साजरा करण्यासाठी ट्रॅक्टर सजवून मृतदेह त्यात ठेवण्यात आला.

"मृतदेहाच्या समोर एक डीजे वाहन होते आणि त्यामागे डझनभर लोक पायी चालत अंत्यसंस्काराला जात होते. तसंच ते नाचत आणि गात होते. मी पहिल्यांदाच मृतदेह नेणारे लोक अश्लील गाण्यावर गुलाल उधळताना पाहिले आहेत. लोक असं डीजे घेऊन अंत्ययात्रा काढतात हे योग्य नाही .'' -अरविंद सिंग, प्रवासी

हेही वाचा :

  1. बिहार विधानसभेत 'फ्लोअर टेस्ट'पूर्वी काय-काय घडामोडी घडतील? जाणून घ्या
  2. Bihar Train Accident : 'अचानक धक्का बसला अन्...', ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितली आपबिती, आतापर्यंत ४ ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.