मनमोहक! राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यामधून रोमांचकारी तुषार; पाहा, VIDEO...

By

Published : Jul 17, 2022, 7:39 PM IST

thumbnail

कोल्हापूर - पावसाळा सुरू झाला की कोल्हापूरकरांचे लक्ष राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधी उघडणार याकडे लागले असते. मात्र यंदा धरण अध्याप 60 टक्के इतकेच भरले आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे ऑगस्ट महिन्यातच भरले, अशी शक्यता आहे. पावसाळ्यात ज्या धरणाच्या स्वयंचलित दरवाजमधून जेंव्हा पाण्याचा विसर्ग सुरू होतो तेंव्हा धडकी भरेल, असे दृश्य पाहायला मिळते. मात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे याच राधानगरी धरणाच्या ( Radhanagari Dam Kolhapur ) सात स्वयंचलित दरवाज्यामधून रोमांचकारी तुषार निर्माण झाले आहेत. ज्यामुळे दरवाजातून जणू पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, असा भास होतो. आजपर्यंत अशा पद्धतीचे दृश्य कदाचित कोणीही पाहिले नसेल. मात्र हे अफलातून आणि नयनरम्य दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले आहे, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील फोटोग्राफर सतीश शेंडगे यांनी.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.