Shivaji Park Dussehra Melava चटणी भाकरी घेऊन शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये

By

Published : Oct 5, 2022, 5:52 PM IST

thumbnail

शिवसेनेत पडलेल्या फुटी नंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावा होत आहेत एकीकडे दसरा मेळावाला गर्दी जमवण्यासाठी सोयी सुविधांवर वारेमाप खर्च केला जात असताना दुसरीकडे शिवसैनिक स्वखर्चाने शिवाजी पार्क मैदानात Dussehra Melava at Shivaji Park ground येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackera यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पहाटे घर सोडले. सकाळी घराबाहेर पडलेल्या शिवसैनिकांनी मुंबईत येताना सोबत चटणी आणि भाकरी आणली होती. मुंबईत येताच गावावरून आणलेली चटणी भाकरी खाऊन पोटाची भूक क्षमवली. शिंदे गटाच्या मेळाव्यावर टीका केली. यावेळी आजूबाजूच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवाजी पार्क परिसर दणाणून सोडले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.