Pune Furniture Godown Fire : पुण्यात फर्निचर गोदामाला भीषण आग, घटनास्थळी १३-१४ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

By

Published : Apr 26, 2022, 7:32 PM IST

thumbnail

पुणे - पुण्यात एका फर्निचर गोदामाला भीषण आग ( fire broke out at a furniture warehouse in Pune ) लागली असून घटनास्थळी जवळपास १३-१४ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. पुण्यातील कोंढवा भागात सोफ्याचे तसेच इतर लाकडी फर्निचरचे ( wooden furniture in Kondhwa area of ​​Pune ) गोदाम असून आज दुपारी ४ च्या सुमारास ही आग लागली होती. ही आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरी जीवितहानी मात्र कुठलीही झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.