Dipak Pandey Dance Chris Gayle : नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचा क्रिस गेल सोबत थिरकले इंग्रजी गाण्यावर, पाहा व्हिडिओ

By

Published : May 26, 2022, 6:37 PM IST

Updated : May 26, 2022, 6:56 PM IST

thumbnail

नाशिक - शहराला शिस्तीचे धडे देत अनेक नव्या नियमांसह महसूल विभागाविरोधातील 'लेटरबॉम्ब'मुळे नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडये राज्यभरात चर्चेत राहिले होते. एकीकडे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले पांडये पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे मुंबईत एका आलिशान हॉटेलमध्ये क्रिकेटपटू क्रिस गेलसोबत पाश्चिमात्य संगीताच्या तालावर पांडये थिरकले ( Deepak Pandey dance with Chris Gayle ). धमाल पार्टीत दंग असलेल्या पांडये यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू, यामुळे समोर आल्याने नाशिकसह राज्यभरात तो चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्तव्य कठोर व शिस्तप्रिय पांडये यांच्यातील आणखी एक गुणवैशिष्ट्य समोर आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

Last Updated : May 26, 2022, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.