Video : मोकाट कुत्र्यांचा विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, विद्यार्थी गंभीर जखमी

By

Published : May 17, 2022, 5:22 PM IST

Updated : May 17, 2022, 6:23 PM IST

thumbnail

नाशिक - जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशात सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालय परिसरातून एक विद्यार्थी शाळेत जात असताना मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर चारी बाजूने जोरदार हल्ला ( dogs attack on students in sinnar ) केला. कुत्र्याच्या हल्ला नंतर विद्यार्थी मोठ्याने ओरडू लागल्यांने परिसरातील नागरिक त्यांच्याकडे धावून आले. काही वेळानंतर येथील नागरिकांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून या मुलाची सुटका केली. मात्र या घटनेत मुलाच्या मानेला, पाठीला, हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सिन्नर नगरपालिकेला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. कुणाल भांडगे ( वय 10 वर्ष ) हा इयत्ता 4 शिकणारा विद्यार्थी आहे. ही घटना 12 मे रोजी दुपारी बारा वाजता सिन्नर सार्वजनिक वाचनालय परिसरात घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल ( nashik viral video ) होत आहे.

Last Updated : May 17, 2022, 6:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.