Chandrapur Flood Video : मूल तालुक्यात अतिवृष्टी; शहरात घुसले पाणी, चंद्रपूरशी संपर्क तुटला

By

Published : Jul 23, 2022, 5:18 PM IST

thumbnail

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत मुसळधार पाऊस पडत ( Heavy Rain In Chandrapur ) आहे. त्यातही मूल तालुक्यात अतिवृष्टी झाली असून शहरात पाणी घुसले आहे. तसेच चंद्रपूर-मूल मार्ग बंद झाला आहे. अनेक घरांत पाणी शिरले असून धोका निर्माण झाला आहे. मागील चोवीस तासांत येथे तब्बल 137 मीमी पाऊस पडला आहे. चंद्रपूर- मूल मार्गावरील पुलावरून अंधारी नदीचे पाणी प्रवाहित होत असल्याने चंद्रपूरचा संपर्क तुटला आहे. तसेच मूल-चामोर्शी मार्ग देखील बंद होण्याची शक्यता आहे. चीचपल्ली गावाजवळ रेड अर्थ रिसॉर्ट येथे 12 जण अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.