Aurangabad Police Commissioner On Loudspeaker : 'भोंगे लावायचे असल्यास परवानगी घ्या, अन्यथा होणार कडक कारवाई'

By

Published : Apr 21, 2022, 6:03 PM IST

thumbnail

औरंगाबाद - भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना नाशिक आणि नागपूरनंतर आता औरंगाबादमध्ये देखील भोंगे लावण्यासाठी पोलीस परवानगी असणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्तांनी ( Aurangabad Police Commissioner On Loudspeaker ) स्पष्ट केले. तर अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार ( MNS chief Raj Thackeray public meeting in Aurangabad ) आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे. या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा मशीदवरील भोंग्याबद्दल बोलणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात आता प्रार्थना स्थळावर भोंगे लावले असतील तर त्यांनी तातडीने परवानगी घ्यावी, नियम पाळावे अन्यथा कारवाई केली जाईल, असे औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता ( Aurangabad Police Commissioner Nikhil Gupta ) यांनी सांगितले आहे. भोंग्यांबाबत आणि सगळेच ध्वनी वादक बाबत सुप्रिम कोर्टाने नियम दिले आहेत. ते नियम आता पालन करावे लागतील. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रार्थना स्थळावर भोंगे लावले असतील त्यांनी तातडीने परवानगी घ्यावी, नियम पाळावे अन्यथा कारवाई केली जाईल. यासाठी काही दिवसांची मुदत त्यांना दिली जाईल, असेही आयुक्त म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.