Parambir Singh : कायद्याला छेद देणारी वागणूक एका पोलीस अधिकाऱ्याकडून अनपेक्षित - ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत

By

Published : Nov 24, 2021, 8:03 PM IST

Updated : Nov 25, 2021, 3:38 PM IST

thumbnail

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh case) यांच्यावर 100 कोटींच्या बेकायदेशीर वसूलीचा आरोप करून फरार असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Commissioner of Police Parambir Singh) यांच्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. आतापर्यंत परमबीर सिंग हे तपासापासून दूर राहण्यासाठी देश सोडून पळून गेल्याचे समोर आले होते. मात्र आता ते देशात असून तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या वकिलाने सांगितले, की मुंबई पोलिसांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते लपून बसले आहे. 48 तासांत सीबीआय किंवा कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात कुठलेही Caveat दाखल न केल्याने परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला का? यावर अधिक माहिती देण्याकरिता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे. परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल परमबीर सिंह यांच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ठाणे, मुंबईमध्ये खंडणी, धमकी यांसारखे अनेक गुन्हे परमबीर सिंग यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर लावण्यात आलेले आहे. परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुठे उपस्थित होतात? हे पाहावे लागणार आहे. ते मुंबईत चांदिवाल आयोगासमोर हजर होतात की, सर्वोच्च न्यायालयासमोर, पहावे लागणार आहे. नेमके प्रकरण काय? परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. तर, दुसरीकडे श्यामसुंदर अग्रवाल यांनी सिंग यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या आरोपांप्रकरणी आतापर्यंत 4 पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. मुंबई पोलीस परमबीर सिंग यांचा शोध घेत आहेत. ते चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे, सिंग यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, त्या आधीच न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. त्यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित करण्यात आले. तसेच, या प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले. तसेच, त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांना दिले. परमबीर सिंग देशातच आहेत, ते फरार होऊ इच्छित नाहीत, आणि कुठे पळूनही जाऊ इच्छित नाहीत. परंतु, त्यांच्या जिवाला सध्या धोका आहे, असे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

Last Updated : Nov 25, 2021, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.