तौक्ते चक्रीवादळ; बॉम्बे हायवर काम करणाऱ्या ३५० पैकी १७७ कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले

By

Published : May 18, 2021, 12:42 PM IST

Updated : May 18, 2021, 8:22 PM IST

thumbnail

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळामुळे कोकोणासह मुंबई शहरालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी या वादळाचा प्रभाव पाहता अरबी समुद्रातील बॉम्बे हायजवळ असलेल्या हिरा ऑइल फिल्ड्स परिसरात काम करणाऱ्या 305 कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय नौसेनेने आयएनएस कोची जहाज मदतीसाठी पाठवले आहे. आतापर्यंत आयएनएस कोची वरून 177 जणांना वाचविण्यात आलेले आहे. दरम्यान वादळाची तीव्रता अधिक असून यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. तरी आयएनएस कोची व आय एन एस तलवार या दोन्ही जहाजांकडून बचावकार्य हाती घेण्यात आल्याचे नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Last Updated : May 18, 2021, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.