BJP vs Shivsena : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने

By

Published : Dec 20, 2021, 11:11 PM IST

Updated : Dec 21, 2021, 2:47 PM IST

thumbnail

मुंबई - 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक आमदार येऊनही सरकार स्थापन करण्यात अपयश आलेल्या भाजपला ही खंत अजूनही सतावत आहे. यासाठी सर्वस्वी भाजपने शिवसेनेलाच जबाबदार ठरवले आहे. मागच्याच महिन्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौर्‍यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह ( Union Minister Amit shah ) यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. या टीकेमध्ये प्रमुख लक्ष त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष शिवसेनेला केले आहे. शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली, भाजपशी विश्वासघात करत सत्ता स्थापन केली, असा आरोप अमित शाह यांनी केला ( Amit Shah on Uddhav Thackeray ) आहे. अमित शाह यांच्या या आरोपांना उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Minister Subhash Desai ) प्रत्युत्तर देत महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दखल घ्यावीशी वाटत असेल किंवा मदत करायची असेल तर त्याचे स्वागत आहे. पण, महाराष्ट्रातील उद्योग हे केंद्राकडून आणि गुजरातकडून पळवले जात आहेत. ते आधी थांबवा, असा सल्लाही त्यांनी दिला. हिंदुत्वावर संकट येईल तेव्हा हेच लोक शेपूट घालून बसतील, अशी घणाघाती टीकाही त्यांनी शाहांचे नाव न घेता केली देसाई यांनी केली. पाहा विशेष वृत्तांत...

Last Updated : Dec 21, 2021, 2:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.