तौक्ते वादळाचा फटका; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषीमंत्री दादा भुसेंकडून पाहणी

By

Published : May 23, 2021, 5:49 PM IST

thumbnail

पालघर - वसई तालुक्यात तौक्ते चक्रीवादळाने अनेक घरे, बागायतींच्या नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी विरारच्या अर्नाळा भागाची पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानाचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त भागात पाहणी करून झाल्यानंतर शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अहवाल शासनाकडे देऊन शासन पातळीवर मदतीसंदर्भात जे काही धोरण ठरेल त्यानुसार नुकसानग्रस्तांना भरपाई देणार असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.