मध्यरात्री आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात गोळीबार, कारण काय?

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 15, 2024, 1:49 PM IST

thumbnail

विरार (ठाणे) Firing in Virar : ठाण्यातील विरारमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडलीय. हा गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. विरार पूर्वच्या गोपचार पाडा परिसरातील आशियाना अपार्टमेंटमध्ये मोबीन शेख हे आपल्या पत्नी व मुलांसोबत राहतात. मध्यरात्री  साडेतीन वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचा दरवाजाची कडी वाजून मदत मागण्याचा बहाणा केला. या दरम्यान आरोपींनी खिडकीतून बेडवर एक गोळी फायर करुन पळ काढला. यावेळी मोबीन हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपले होते. सुदैवानं फायर झालेली गोळी कोणाला न लागता भिंतीला लागली. यामुळं या गोळीबारात कोणीही जखमी नसल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती विरार पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.  विरार पोलीस ठाण्यात या प्रकरणी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांची पथकं आरोपींचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.