Ulhas Bapat: सत्ता संघर्ष निकालावर घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले की, 16 आमदार...

By

Published : May 11, 2023, 12:49 PM IST

Updated : May 11, 2023, 12:56 PM IST

thumbnail

पुणे : राज्यातील सत्ता संघर्षावर आज निकाल येणार होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई होणार की, दिलासा मिळणार? याचे चित्र आज स्पष्ट होणार होते. पाच सदस्यीय घटनापीठ आज देणार सर्वोच्च निकाल देणार होते. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी हा निकाल आज सकाळी अकरा वाजता देण्यास सुरूवात केली होती. याबाबत घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले होते की, आजचा निर्णय हा महाराष्ट्रापुरता मर्यादीत असणार आहे. 16 आमदार जर अपात्र झाले तर त्यांच्या मागून गेलेले आमदारही अपात्र होणार आहे. ते आमदार पुन्हा ठाकरेंकडे येवू शकणार नाहीत. हा खटला इतके दिवस चालू राहणे हेच मुळात चुकीचे आहे. आज निकाल लागत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. 16 आमदार जर अपात्र ठरले तर राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते. तसेच आमदारांच्या अपत्रबाबत विधानसभा अध्यक्षांकडे देखील अधिकार देऊ शकतात. देशात काही खटले असे देखील झाले आहे. ज्यात सुप्रीम कोर्ट देखील चुकले आहे. एकूणच आत्ताच्या निकालाबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मत व्यक्त केले आहे. 

Last Updated : May 11, 2023, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.