मनमाडला शिंदे गटाकडून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 8:35 PM IST

thumbnail

मनमाड(नाशिक) Sushma Andhare News : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Shinde Group Manmad) यांची आज (रविवारी) मनमाडला महाप्रबोधन यात्रे अंतर्गत सभा होती. (MLA Suhas Kande) या सभेला जाताना आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला. (Attempt to block Sushma Andhare car)
 

सभा रद्द करण्याचे आवाहन : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या प्राध्यापक सुषमा अंधारे यांची आज मनमाडला सभा होती. या सभेला आमदार सुहास कांदे यांच्या गटातर्फे मोठा विरोध करण्यात आला. यासाठी रिपब्लिकन पक्ष, भाजपा यांच्यासह इतर काही लोकांनी पोलिसांना पत्र देऊन सभा रद्द करण्यात यावी असे सांगितले. यानंतर वातावरण पेटले आणि सुषमा अंधारे यांच्यातर्फे फेसबुक लाईव्ह करून मी मनमाडला येणार आणि सभा घेणार हे सांगितले. यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या शहरप्रमुखांनी फेसबुक लाईव्ह करून विरोध केला. सभा सुरू होण्यापूर्वी सभास्थळी जाण्यासाठी सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्यात आली.

सभेचे पोस्टर पालिकेने उतरवले : सुषमा अंधारे यांची सभा मनमाडला होणार आहे. सभेला पालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली; मात्र या सभेला तहसीलदारांनी परवानगी नाकारली. यामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी गावातील सर्व लावण्यात आलेले पोस्टर उतरविले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.