Supriya Sule Appeal State Govt: 'सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ईडी सरकार असंवेदनशील'

By

Published : Mar 19, 2023, 8:43 PM IST

thumbnail

पुणे: सध्या राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकळ घातला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. सरकार पंचनामे करून मदत देतो अशी घोषणा करत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. याविषयी सरकार असंवेदनशील असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे पवार यांनी आज केली आहे.
 


तर हे झालेच नसते: सुप्रिया सुळे यांनी आज कात्रज भागामध्ये विकास कामाची पाहणी केली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सरकारकडून आणखी काही अपेक्षा नाही, नाशिकच्या आदिवासी आणि शेतकऱ्यांना सुद्धा मोर्चा काढत पायपीट करत यावे लागले. अगोदरच त्यांच्या समस्या सोडवल्यास त्यांनी त्यांना हवा तो भाव दिला असता, तर हे झालेच नसते; पण सरकार ते पोहोचेपर्यंत वाट बघतील. त्यामुळे हे सरकार किती शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील आहे, हे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
 


गायकवाड यांच्यावर टीका:  शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या तर आत्महत्या रोजच होतात. त्याचबरोबर 95 टक्के सरकारी नोकरदार हे कुठल्या संपत्तीवर असतात, हे माहीत आहे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हे वाचाळवीर सरकार आहे, यात नवीन काहीच नाही आणि असेच होणार. यांच्याकडे संवेदनशीलता नसल्यामुळेच, हे असे वक्तव्य करत असतात आणि यापेक्षा आणखी काही अपेक्षा नाही, अशीसुद्धा प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर दिली आहे .
 


भाजपची ही देशामधलीच राजनिती:  शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये अंतर्गत वाद चालू आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 48 जागा देण्याचे एक वक्तव्य केले होते. त्यांचा व्हिडिओ सुद्धा बाहेर आला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाची देशांमधलीच ही रणनीती आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये त्यांच्यासोबत युती किंवा आघाडी केलेल्या पक्ष आहेत. त्यांना हा अनुभव आलेला आहे की, ते सोबतच्या पक्षांना कशा प्रकारची वागणूक देतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
 


वाहतूक कोंडीबाबत अपेक्षा: पुण्यातील कात्रज येथील ब्रिजच्या बांधकामाचे पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. हा साधारणपणे पाठपुरावा करायचे म्हणून हे मी पाहण्यासाठी आलो होतो. या तारखेला काम होईल त्या तारखा आम्ही घेतलेल्या आहेत. त्यामुळे इथली वाहतूक कोंडी सुटेल, अशी अपेक्षा आहे. म्हणून हा पाठपुरावा करत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा:  Pankaja Munde Challenges BJP: 'आता निवडणुका घ्याच, तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील'

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.