Hanuman Chalisa in AMU : अलीगढ विद्यापीठातील मुस्लिम विद्यार्थ्याकडून हनुमान चालिसाचे पठण, सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

By

Published : Apr 19, 2022, 5:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail

लखनौ - अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील ( Aligarh Muslim University ) विद्यार्थ्याने हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa read by Muslim ) आणि गायत्री मंत्राचे ( Gayatri Mantra by Muslim student ) पठण केले. यातून विद्यार्थ्याने हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण दाखवून दिले आहे. मंगळवारी बीएचा विद्यार्थी मोहम्मद फरीद ( Mohammad Farid Hanuman Chalisa ) याने अलीगढ मुस्लिम विद्यापीठात हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्राचे पठण ( gayatri mantra hanuman chalisa in amu ) केले. ईटीव्ही इंडियाशी खास बातचीत करताना फरीदने सांगितले की, लहानपणी हनुमान चालीसा वाचली होती. तेव्हापासून लक्षात ठेवली आहे. सध्या देशात हनुमान चालीसा आणि अजानवरून वाद सुरू आहे. हा वाद संपवण्याच्या इच्छेने त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. जेणेकरून देशात शांतता आणि सामाजिक ऐक्य राहिल. फरीद म्हणाला की, आम्हाला हनुमान चालीसा ऐकण्यात कोणतीही अडचण नाही. हनुमान चालीसा भारताच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक चौकात वाजवावी. मुस्लिमांना यात काही अडचण नव्हती, यापुढेही नाही आणि होणारही नाही. मशिदींसमोर माईक लावून हे वाचन केल्यास चुकीचा संदेश जातो.

Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.