MLC Election 2022 : आघाडीने घेतली आहे सर्व काळजी - आमदार रोहित पवार

By

Published : Jun 20, 2022, 10:16 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

thumbnail

मुंबई - राज्यसभेने खूप काही शिकवले. विधान परिषदेच्या निवडणुकीतही ( MLC Election 2022 ) विरोधी पक्ष कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो आमदारांवर दबाव देऊ शकतो. त्यामुळे यावेळी आघाडीने सर्व काळजी घेतली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांनी दिली. राज्यसभेच्यावेळी एक मत बाद झाले म्हणून सगळे चित्र बदललं. यावेळी प्रत्येक मतांची काळजी घेतली आहे. भाजप अतिआत्मविश्वासाने बोलत आहे. मात्र, त्यांच्याकडे संख्याबळ नाही. भाजप वातावरण निर्माण करते ही त्यांची रणनीती आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे अति आत्मविश्वास नाही, असेही पवार म्हणाले. त्या अपक्ष आमदारांबाबत विचारले असते बहुतांश जणांनी आघाडीलाच साथ दिली आहे. संवादातून नाराजी संपली आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.