Mira Road Murder : पुतण्याकडून काकीची निर्घृण हत्या; एका तासात आरोपीला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 7:37 AM IST

thumbnail

भाईंदर Mira Road Murder : मिरारोड पूर्वेच्या क्विंस पार्क मधील क्विंस अव्हेन्यू इमारतीमध्ये सख्या पुतण्याकडून काकीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलीय. घटनास्थळी नवघर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केलय. दिशान (20) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 
 
पळ काढत असताना आरोपीला अटक : नवघर पोलीस ठाणे हद्दीतील क्विंस पार्क मध्ये एका मुलाकडून महिलेची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवघर पोलिस घटनास्थळी दाखल होताच क्विंस अव्हेन्यू इमारती मधील खोली क्र. 202 मध्ये महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. तसंच सोबत घरात या महिलेचा 11 वर्षीय मुलगाही आढळून आलाय. आरोपीकडून सख्या काकांच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावेळी त्याची आई शबाना (मृत) वाचवण्यास आली असता आरोपी दिशाननं काकीच्या गळ्यावर चाकूनं सपासप वार केले. तसंच स्वतःच्या उजव्या हातावरदेखील वार केला. खून करून घटनास्थळावरून दिशान पळ काढत असताना दिशानला पोलिसांनी ताब्यात घेतल. याप्रकरणी अधिक तपास नवघर पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.