Sandipan Bhumare Challenge To MVA : 'प्रकाश आंबेडकर येऊ द्या, राष्ट्रवादी येऊ द्या, पानिपत कुणाचं होते ते 2024 च्या निवडणुकीत दिसेल'

By

Published : Mar 31, 2023, 10:36 PM IST

thumbnail

बीड: छत्रपती संभाजीनगर येथे 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरून, मंत्री संदिपान भुमरे यांनी टीकास्त्र सोडले आहेत. ते एकटे सभा घेत नाहीत. तिघे मिळून सभा घेतात, अशी टीका करत त्यांनी अशा कितीही सभा घेतल्या, तरी युतीचेच सरकार येणार, असा विश्वास यावेळी संदीपान भुमरेंनी व्यक्त केला. ते बीडच्या नारायणगड येथे दर्शनासाठी आले असता मीडियाशी बोलत होते. दरम्यान प्रकाश आंबेडकर येऊ द्या, राष्ट्रवादी येऊ द्या, ठाकरे गट येऊ द्या, पानिपत कुणाचं होते ते 2024 च्या निवडणुकीत दिसेल, असे म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर देखील निशाणा साधला. 
 


काय म्हणाले भुमरे?  भुमरे म्हणाले, की महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजी नगर येथे होत आहे. मात्र त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी युतीचेच सरकार येणार आहे. आज सगळ्या ठिकाणी त्यांना महाविकास आघाडी म्हणून सभा घ्यावी लागत आहे. ते एकटे सभा घेत नाहीत, तिघे मिळून सभा घेत आहेत. मात्र संभाजीनगरची जी सभा होईल, ती फक्त शिवसेनेची होईल. मग ती कशी होईल ते बघा, असे म्हणत उघड आव्हान देखील यावेळी भुमरे यांनी दिले. काय म्हणालेत संदीपान भुमरे पाहुयात...

हेही वाचा:  Thane Crime : मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या ४ मुकुटांची चोरी; एकाच रात्री ४ घरफोड्या

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.