Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या बैठकीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत चर्चा नाहीच...

By

Published : Nov 4, 2022, 9:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari ) आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत ( Karnataka Governor Thawarchand Gehlot ) या दोघांंमध्ये महत्वपूर्ण पार पाडली. तब्बल अडीच ते तीन तास चाललेली बैठक दुपारी अडीच वाजता संपली. आज कोल्हापूरात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत अनेक विषयांवर चर्चा अपेक्षित होती. ज्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाबाबत सुद्धा चर्चा होईल, असे बोलले जात होते. मात्र या बैठकीत सीमावादाबाबत एक शब्द सुद्धा चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. केवळ अलमट्टी धरण, दोन्ही राज्यातील पर्यटन, इतर महत्वाचे निर्णय आदींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सीमाप्रश्नावरून काहीतरी चर्चा होईल अशा अपेक्षा होत्या. मात्र, याविषयी चर्चा झाल्या नसल्याचे दिसत आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.