'त्यासाठी राजेश टोपेंना दहा जन्म घ्यावे लागतील', नेमकं काय म्हणाले बबनराव लोणीकर? पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 8:11 AM IST

thumbnail

जालना Babanrao Lonikar On Rajesh Tope :  जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बिनविरोध पार पडली मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून वाद निर्माण झालाय. अध्यक्ष निवडीवरून शनिवारी (2 डिसेंबर) दुपारी माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगड आणि शाईफेक झाली होती. हा हल्ला भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यानंतर याचे पडसाद जालन्यात उमटल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बबनराव लोणीकर यांच्या घरावर राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची माहिती  संपूर्ण जिल्ह्याभरासह राज्यात पसरली. तसंच या चर्चेला उधाण आल्यामुळं पोलिसांनी घटनास्थळी येत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु, यानंतर काहीवेळातच बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या घरावर नाही तर टोपेंच्याच भावाच्या घरावर दगडफेक झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच माझ्या घरावर दगडफेक करण्यासाठी राजेश टोपे यांना दहा जन्म घ्यावे लागतील, अशी टीका केली. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.