Maharashtra political crisis : अजित पवार यांच्या मेळाव्याला 42 मधील फक्त 30 आमदार उपस्थित, अजित पवार गटात धाकधूक

By

Published : Jul 5, 2023, 3:58 PM IST

thumbnail

मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय गदारोळ आता रंजक होत आहे. राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी आज स्वतंत्र बैठक बोलाविली आहे. त्यामुळे संभ्रमात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज नेमकी भूमिका घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीत अजित पवार व शरद पवार यांच्याकडे असलेले संख्याबळ आज स्पष्ट होणार आहे. अजित पवार गट आणि शरद पवार या दोन्ही गटांची सभा, मेळाव्यातून लोकांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे. अजित पवार गटाच्या बैठकीला 30 आमदार उपस्थित असून उर्वरित 15 आमदार कुठे आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांची संख्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे बोलत आहेत. पण उर्वरित आमदार बैठकीला न पोहोचल्याने अजित पवार गटाचे पदाधिकारी आमदारांशी फोनवर संपर्क साधत आहेत.
 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.