Vinayakrao Mete Birth anniversary : विनायक मेटेंचा 'तो' शेवटचा वाढदिवस ठरेल असे वाटले नव्हते - डॉ. ज्योती मेटे

By

Published : Jun 30, 2023, 4:06 PM IST

thumbnail

बीड : पत्नी म्हणून मी साहेबांचा 60 वा वाढदिवस मोठा करायचे ठरवले होते. पण तो त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल असे वाटले नव्हते, अशा भावना दिवंगत विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी व्यक्त केल्या आहेत. आज दिवंगत विनायकराव मेटे यांची जयंती आहे. त्यानिमित्त बीड येथील विनायक मेटे यांच्या स्मृती स्थळाजवळ अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत. आज विनायक मेटे यांचा वाढदिवस आहे. साहेबांचे शेवटचे वाढदिवसाचे भाषण माझ्या डोक्यात पूर्णपणे घुमत आहे. साहेबांची सर्व अधुरी स्वप्ने अपूर्ण राहिल्याची खंत ज्योती मेटे यांनी मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.