Ganesh Festival 2023 : राज्यातील विद्यार्थ्यांची सर्वांत मोठी गणेश विसर्जन मिरवणूक, पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 9:28 PM IST

thumbnail

बुलडाणा Ganesh Festival 2023 : जिल्ह्यातील चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी निघण्याची गेल्या चाळीस वर्षांपासून परंपरा आहे. (Ganesh Immersion Procession) यानुसार आज (बुधवारी) मिरवणुकीत या विद्यालयाचे पहिली ते बारावी इयत्तेचे जवळपास ५५०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रत्येक वर्गाचा सामाजिक संदेश देणारा वेगवेगळा देखावा साकारण्यात आला आहे. (Students Ganesh Immersion Procession)
गेल्या चाळीस वर्षांची परंपरा असलेली, अगदी शिस्तीत निघणारी ही मिरवणूक राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांची इतक्या मोठ्या संख्येने असणारी राज्यातील एकमेव गणेश विसर्जन मिरवणूक आहे. संपूर्ण चिखली शहरातून ही मिरवणूक निघाली आहे. या मिरवणुकीसाठी कुठलाही पोलीस बंदोबस्त नाही. मिरवणुकीला आमदार श्वेता महाले यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे. (Anant Chaturdashi 2023)  चंद्रयान-3 ची प्रतिकृती असलेली दिंडी सोबत अष्टविनायकाचे दर्शन देणारे दिंडी रुपी शोभायात्रा, विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेली संत श्री गजानन महाराज यांची वारकऱ्यांची वारी याचे एक प्रतिरूप तयार करण्यात आले आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्याची ही आगळीवेगळी विलोभनीय मिरवणूक निश्चितच कौतुकास्पद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.