Ganesh Festival 2023 : पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष; ढोल ताशांचा गजर करत बाप्पाचं दिमाखात आगमन... पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 1:08 PM IST

thumbnail

पुणे Ganesh Festival 2023 : 14 विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचा आज आगमन सोहळा पार पडला. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे 'गणपती बाप्पा मोरयाच्या' जयघोषाने ढोल ताशांच्या गजरात स्वागत (Dagadusheth Halwai Ganapati Miravnuk) करण्यात आले. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. मोरया मोरयाच्या जयघोषात बाप्पाचा आगमन सोहळा (Pune Ganeshotsav) पार पडला.
मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagadusheth Halwai Ganapati) मिरवणुकीला सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून सुरूवात झाली होती. रितीरिवाजानुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक (Ganapati Miravnuk In Pune) काढण्यात आली. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तर सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. (Ganesh Chaturthi)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.