Chandrayaan 3: चंद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक, पाहा व्हिडिओ
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg?imwidth=128)
Published : Aug 23, 2023, 11:10 AM IST
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-08-2023/640-480-19334888-thumbnail-16x9-ccccc.jpg)
पुणे : भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी. या मोहिमेत शास्त्रज्ञांना यश मिळावं, म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीनं मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आलाय. अभिषेकासाठी दूध, दही, विविध फळांचे रस, सुकामेवा यांचा वापर करण्यात आलाय. आज संध्याकाळी भारताचं चंद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याचं लँडिंग सुरक्षित व्हावं, यासाठी हा अभिषेक करण्यात आलाय. याशिवाय गणपती बाप्पाच्या मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र श्रृंगार करत बाप्पाला सजवण्यात आलं होतं. चंद्रयान 2 च्या अपयशानंतर आता या मोहिमेकडून इस्रोला बऱ्याच अपेक्षा आहेत. या मोहिमेकडं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. येथे आतापर्यंत कोणत्याचं देशाचं यान यशस्वीरित्या उतरू शकलेलं नाही. नुकतंच 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान तेथे उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झालंय. त्यामुळं आता भारत या मोहिमेत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होणार आहे. (abhishek to Dagdusheth Ganapati for Chandrayaan 3)