VIRAL VIDEO : मृत मुलाला जिवंत करण्यासाठी कबरेतून काढले; मंत्रतंत्र अपयशी झाल्याने परत केले दफन

By

Published : Aug 4, 2022, 12:18 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

thumbnail

अलीगड (यूपी) - एकविसाव्या शतकातही (Boy dead body taken out from grave in Aligarh ) लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहे. याची प्रचिती अलीगड ( Boy dead body taken out from grave up ) तहसील खैर भागातील शिवाला खुर्द गावात घडलेल्या घटनेने आली. येथे एका विषारी नागाने एका बालकाला ( Boy dead body taken out from grave viral video ) दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी त्याच्या मृतदेहाला दफन केले होते. मात्र, नातेवाईक सापाचे वीष काढणाऱ्या लोकांकडे गेले. त्यांनी मुलाला जिवंत करण्याचे म्हटले. त्यानंतर मृत मुलाच्या मृतदेहाला कबरीतून बाहेर काढण्यात आले. सापाचे वीष काढणाऱ्यांकडून मृतदेहावर मंत्रतंत्र करण्यात आले. मात्र, मुलगा जिवंत झाला नाही. त्यानंतर मुलाला पुन्हा मृत घोषित करून त्यास दफन करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी 'ईटीव्ही भारत' करत नाही.

Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.