शरद पवार गटाकडून छगन भुजबळ, रूपाली चाकणकरांचा निषेध; सावित्रीबाईंच्या पुतळ्याला घातला दुग्धाभिषेक

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 5:00 PM IST

thumbnail

सातारा Bhujbal Chakankar protest : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर शरद पवार गटाने सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. यामुळे स्मारक परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ज्या मनुवादी वृत्तींनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंना त्रास दिला, त्यांची बदनामी केली अशा (Savitribai Phule) वृत्तींबरोबर जाऊन मंत्रिपद भोगणाऱ्या आणि भ्रष्टाचार लपविणाऱ्यांना फुले दाम्पत्याला अभिवादन करण्याचा अधिकार नाही. त्यांचा विरोध म्हणून आम्ही सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याचे राष्ट्रवादीच्या औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ यांनी सांगितले. भुजबळ आणि चाकणकर यांनी यापुढे नायगावला येताना विचार करावा, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ यांनी दिला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.