Video : गुजरातमध्ये वादळी पाऊस; एकूण 61 जणांचा मृत्यू

By

Published : Jul 12, 2022, 11:45 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

thumbnail

अहमदाबाद: गुजरातमध्ये (Heavy rains in gujarat) 1 जून ते 11 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 67 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी सोमवारी दिली. राज्यातील एकूण 12 तालुक्यांमध्ये सरासरी आठ इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला असून सर्वात जास्त 12 इंच पावसाची नोंद लहानउदेपूरच्या बोडेली येथे झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Assures Help) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Gujarat Chief Minister Bhupendra Patel) यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पटेल यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, असे मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे राज्य महामार्ग आणि पंचायत रस्त्यांसह 388 रस्ते बंद झाले आहेत. ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) 13 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) 16 तुकड्या बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत, असे सरकारी पत्रकात म्हटले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.