ST Workers Strike : वकील सदावर्ते कामगारांची दिशाभूल करत आहेत : मंत्री अनिल परब

By

Published : Apr 9, 2022, 5:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail

मुंबई : शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST Workers Maharashtra ) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे अचानक आंदोलन करत हल्ला ( Silver Oak Attack ) केला. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. तसेच यावर विविध प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. आता यावर परिवहन मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली ( Anil Parab On Silver Oak Attack ) आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत चौकशी करूनच संपूर्ण निष्कर्ष काढले जातील, असेही अनिल परब म्हणाले. या प्रकरणात चौकशी होईल, चौकशीअंती कारवाई होईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे. मात्र कायदा हातात घेतला तर कारवाई केली जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन कर्मचाऱ्यांनी करावे. सरकारवर दबाव आणू नये. सदावर्ते ( Advocate Gunratna Sadavarte ) यांनी विलीनीकरण करणारच ( ST Merger With Government ) असे सांगून संप ( ST Workers Strike ) खेचला. कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. सदावर्ते यांना आलेल अपयश लपवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले. सदावर्तेनी काहीही मिळवून दिले नाही. स्वतःच अपयश लपवण्यासाठी सदावर्ते यांनी हे कृत्य केले, असेही परब यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.