MSP Guarantee Act : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एमएसपी गॅरंटीचा कायदाही आणावा - नवाब मलिक

By

Published : Nov 24, 2021, 1:31 PM IST

thumbnail

मुंबई : तीन कृषी कायदे मागे(Farm Laws Repeal) घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर्णय घेतला असला तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत(एमएसपी)(MSP Guarantee) मिळावी ही मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. केंद्र सरकारने एमएसपीबाबत कायदा लागू करावा(MSP Guarantee Act) अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) लक्ष घालावे असे आवाहन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केलं आहे. तसेच शेतकरी आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्यांनाही केंद्र सरकारने योग्य मोबदला द्यावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करून कंगना रणौत लोकांच्या तसेच विशेष समुदायाच्या भावना दुखावत आहे. अभिनेत्री कंगना रणौतविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली असून कायद्याचं उल्लंघन झाल्यास कंगना रणौत यांना दिलेली केंद्रीय सुरक्षा उपयोगात येणार नाही असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.